Commissioner Praveen Gedam esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा!

Nashik News : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हा परिषदेत येऊन प्राथमिक शिक्षण विभागाचा तब्बल साडेतीन तास आढावा घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या धामधुमीत रुजू झालेले विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आचारसंहिता काहीशी शिथील झाल्यावर कामकाजाला सुरवात केली. बुधवारी (ता. ३) डॉ. गेडाम यांनी जिल्हा परिषदेत येऊन प्राथमिक शिक्षण विभागाचा तब्बल साडेतीन तास आढावा घेतला. (Divisional Commissioner Dr. Praveen Gedam came to Zilla Parishad)

यात प्रामुख्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण राबविण्यात आलेल्या सुपर ५० व स्पेलिंग बी स्पर्धेविषयी माहिती घेतली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी या वेळी दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील विविध योजना, समग्र शिक्षण अभियान यांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, धनंजय कोळी, नीलेश पाटोळे, सुनील दराडे, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे, वर्षातून दोनदा ही तपासणी व्हावी, त्यासाठी डॉ. गेडाम यांनी लागलीच जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना बोलावून घेत, त्यांच्याशी चर्चा करीत तपासणीसाठी टीम करावी. विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यास त्यांना काही गंभीर आजार, व्याधी असल्यास त्यांचे निदान होईल. (latest marathi news)

त्यांना वेळात चांगल्या रुग्णालयांत उपचार कसे होतील, याबाबत नियोजन करणे शक्य होईल. त्यासाठी निधीची कशी तरतूद करता येईल, यावर विचार करता येईल. यासाठी १५ दिवसांत आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत तसेच समग्र शिक्षणमधील असलेल्या सर्व योजना, त्यांना असलेले लेखाशीर्ष, निधी यांचा सविस्तर आढावा घेत, त्यांनी माहिती जाणून घेतली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किती शिक्षक आहे, रिक्त जागा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच किती शाळांमध्ये वीजपुरवठा नाही, शौचालये, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, हात धुण्याचे स्टेशन नाही याबाबत विचारणा करीत, त्याबाबत लागलीच नियोजन करावे, असे निर्देश डॉ. गेडाम यांनी या वेळी दिले. डिजिटल शाळांबाबतही त्यांनी माहिती घेतली. नावीन्यपूर्ण योजनेतून राबवत असलेल्या सुपर ५० उपक्रम काय आहे.

कसा राबविला गेला, त्यासाठी निधीची तरतूद कशी करण्यात आली त्याबाबत माहिती घेत, या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. स्पेलिंग बी स्पर्धा कशी राबविली गेली, त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे, याबाबतही डॉ. गेडाम यांनी जाणून घेतले. शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती घेत, ही गुणवत्ता आणखी वाढविण्यासाठी नियोजन करावे, त्याबाबत आराखडा करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

नवीन प्रशासकीय इमारतीला दिली भेट

जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीनंतर विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी त्र्यंबकेश्‍वर रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी केली. पहिल्या तीन मजल्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या. फर्निचर, वीजपुरवठा याबाबत असलेल्या प्रस्तावाबाबत माहिती घेत, हे प्रस्ताव कसे मार्गी लागतील, याबाबतही त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांना सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT