फोटो : H34699, H34696
-------------
बाजारपेठेत खरेदीसाठी तुडूंब गर्दी
चाकरमान्यांमध्ये उत्साह, शालिमार भागातील वाहतूक रेंगाळली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : दीपोत्सवाला उत्साहात सुरुवात झालेली असताना, खरेदीचा ओघ अजूनही सुरु आहे. शनिवारी (ता. ७) चाकरमान्यांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. यामुळे प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, शालिमार व परिसरात वाहतूक व्यवस्था रेंगाळली होती. पथविक्रेत्यांपासून दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची तुडूंब गर्दी झाली होती.
औद्योगिक क्षेत्रात दिवाळीच्या सुट्या सुरु झाल्या असल्याने, कामगार वर्गाकडून खरेदीसाठी पावले बाजारपेठांकडे वळविल्याचे चित्र दिसले. शनिवारी सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसली. रेडिमेड कापड खरेदीसाठी शालिमार, शिवाजी रोड, दहीपुल आदी भागांमध्ये गर्दी झाली होती. सजावटीचे सामान खरेदीसाठी कानडे मारुती लेन तर पूजाविधीच्या साहित्यासाठी रविवार कारंजा भागात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल खरेदीसाठी महात्मा गांधी मार्ग, घनकर लेन आदी भागात गर्दी होती. रविवारी (ता.८) खरेदीचा ओघ कायम राहण्याचा अंदाज असून, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व्यावसायिक वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे.
---------
वाहतुकीचा बोजवारा
प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ, रविवार कारंजा भागात बसगाड्यांच्या वाहतुकीला निर्बंध घातले असले तरी, चारचाकी वाहनांच्या प्रवेशामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. विशेषतः शालिमार भागातील रस्ते अरुंद असल्याने, व थेट रस्त्यावर पथविक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने, पायी चालणाऱ्या ग्राहकांनी रस्ते व्यापल्याने या भागातील वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प झाली होती. मेनरोडकडे जाणारा रस्ता विविध ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.