Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : चारपेक्षा अधिक निविदांची फाइल आता निविदा समितीकडे : डॉ. अर्जुन गुंडे

Nashik ZP : जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुपाटबंधारे या विभागांनी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत चार वा त्याहून अधिक मक्तेदार सहभागी झाल्यास ती निविदा समितीकडे मंजुरीसाठी पाठवावी.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या (ZP) बांधकाम, लघुपाटबंधारे या विभागांनी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत चार वा त्याहून अधिक मक्तेदार सहभागी झाल्यास ती निविदा समितीकडे मंजुरीसाठी पाठवावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या निविदा समितीचे अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी बांधकाम विभाग क्रमांक एक व दोन यांना दिले आहेत. त्यामुळे निविदेतील अनियमिततेला आळा बसणार आहे. (nashik ZP Dr Arjun Gunde statement marathi news)

जिल्हा परिषद बांधकामांसाठी तीन विभाग व जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवली जाते. या निविदा प्रक्रियेत सहभागी ठेकेदार पात्र ठरवण्याची जबाबदारी प्रामुख्याने निविदा समितीची असते. कोणतीही निविदा मंजूर होण्यासाठी किमान तीन जणांनी त्यात सहभाग घेणे अनिवार्य आहे.

त्यात निविदेमध्ये तीन ठेकेदार सहभागी असतील तर त्या निविदांचा तांत्रिक लिफाफा कार्यकारी अभियंता स्तरावर उघडून ठेकेदारांना पात्र-अपात्र ठरवण्याचा अधिकार त्यांनाच असतो. मात्र, तीनपेक्षा अधिक ठेकेदार निविदेमध्ये सहभागी असल्यास तांत्रिक लिफाफा उघडून ठेकेदार पात्र-अपात्र ठरवण्याचा अधिकार निविदा समितीला असतो.

त्यानुसार तीनपेक्षा अधिक ठेकेदार सहभागी असल्यास ती फाइल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग क्रमांक तीन वगळता इतर विभाग त्यांच्या स्तरावरच तांत्रिक लिफाफा उघडून ठेकेदारांना पात्र-अपात्र ठरवतात. (latest marathi news)

यामुळे अनेकदा वाद निर्माण होऊन त्याच्या तक्रारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे येतात. यामुळे ठेकेदारांमध्ये वाद निर्माण होऊ नये, यासाठी निविदा समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी यापुढे तीनपेक्षा अधिक निविदा आलेल्या सर्व फायली निविदा समितीकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कागदपत्रांची छाननी होणार

निविदा समितीकडे फाइल आल्यानंतर लेखा व वित्त विभागाकडून त्याची छाननी केली जाते. त्यात सर्व नियम व निकषांनुसार ठेकेदार पात्र-अपात्र असल्याचा अभिप्राय लिहिला जातो. त्यानुसार निविदा समिती आपला निर्णय देते. मात्र, या निविदा पात्र-अपात्रतेचा निर्णय कार्यकारी अभियंता स्तरावर झाल्यास कागदपत्रांची छाननी केली जात नाही.

परिणामी अनेकदा अनियमितता झाल्याच्या तक्रारी होतात. मात्र, आता या निविदेच्या फायली निविदा समितीकडे गेल्यास वित्त विभागाकडून कागदपत्रांची छाननी होणार असल्याने अनियमिततेला आळा बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT