Society members participating in the procession taken out to the beat of traditional instruments on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti. esakal
नाशिक

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डीजेच्या दणदणाटात मिरवणूक; कडेकोट पोलिस बंदोबस्त

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने भद्रकालीतील मोठा राजवाडा येथून मोठ्या उत्साहात मिरवणुकीला प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने भद्रकालीतील मोठा राजवाडा येथून मोठ्या उत्साहात मिरवणुकीला प्रारंभ झाला. मात्र ध्वनीमर्यादेचे बिनधास्तपणे उल्लंघन करीत मंडळांनी डीजेचा वापर केला. मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुने नाशिकमधील मोठा राजवाडा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीला प्रारंभ झाला. (nashik Dr Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with heavy police security in city)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त सिदधेश्वर धुमाळ, युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.

मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांसमवेत पोलिस अधिकार्यांचे एक पथक तैनात करण्यात आले होते. तरीही मंडळांकडून धीम्यागतीने वाटचाल सुरू होती. तसेच, ध्वनीमर्यादेचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. मंडळांना डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याच्य सूचना देण्यात आल्या होत्या.  (latest marathi news)

परंतु सर्रासपणे डीजेचा वापर करण्यात आला. मिरवणूक मार्गांवरही मंडळांकडून उभारण्यात आलेल्या स्टेजवर डीजे लावण्यात येऊन त्यावर तरुणाई थिरकत होती. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणार्या मंडळांविरोधात पोलीस काय भूमिका घेत, याकडे आता अनेकांचे लक्ष लागून आहे.

बाऊंसर्स कोणासाठी?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये यंदा पहिल्यांदा मोठ्या संख्येने असलेले बाऊंसर्स लक्ष वेधून घेत होते. सराईत गुन्हेगाराच्या अवतीभवती बाऊंसर्सच्या घोळक्यामुळे सर्वसामान्यांना मिरवणुकीत चालताना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. एवढेच नव्हे तर पोलिसांसमोर शहरातील काही सराईत गुन्हेगार हे बाऊंसर्स घेऊन मिरवणूकीमध्ये वावरत होते. त्यातून या सराईत गुन्हेगारांनी समाजाला की पोलिसांना काय संदेश दिला असावा, अशीच चर्चा उपस्थितांमध्ये होती. तसेच अशा प्रवृत्तींना पोलिसांनी वेळीच अटकाव घातला पाहिजे अशीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT