Nashik Dr. Ambedkar Jayanti Miravnuk esakal
नाशिक

Nashik Dr. Ambedkar Jayanti Miravnuk : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत डीजेचा दणदणाट! पोलिसांकडून गुन्हे दाखल

Nashik News : परिमंडळ एकमध्ये ७ मंडळांविरोधात कारवाई केली होती तर, परिमंडळ दोनमध्ये एकाही डीजेवर कारवाई करण्यात आलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dr. Ambedkar Jayanti Miravnuk : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भद्रकाली व नाशिकरोड परिसरातून डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली असता, पोलिसांनी मिरवणूक आटोपल्यानंतर मध्यरात्री डीजे मालकांसह मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. परिमंडळ एकमध्ये ७ मंडळांविरोधात कारवाई केली होती तर, परिमंडळ दोनमध्ये एकाही डीजेवर कारवाई करण्यात आलेली नाही. (Nashik Dr babasaheb Ambedkar Jayanti Miravnuk news)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत व रस्त्यालगत उभारले जाणाऱ्या मंडपासमोर डीजे लावून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन न करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालयाने शांतता समितीच्या बैठकीमध्ये दिल्या होत्या.

तसेच, पोलीस ठाणेनिहाय बैठका घेत जयंती साजरी करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानुसार, ध्वनीमर्यादेची माहितीही दिली होती. असे असतानाही रविवारी (ता.१४) जयंती मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी डीजेचा दणदणाट केलाच.

तर काही मंडळांनी चौका-चौकात उभारलेल्या मंडपासमोरही डीजे वाजवून ध्वनीमर्यादेचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजेचालक व मंडळांवर कारवाई केली. परिमंडळ एकमध्ये ७ डीजेचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर, परिमंडळ दोनमध्ये मंडळांनी डीजे वाजविले असले तरी त्यांनी ध्वनी मर्यादेचे पालन केल्याचा दावा पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केला आहे. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये एकही ध्वनीमर्यादेचा उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. (latest marathi news)

बाऊंसर्स कोणासाठी?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये यंदा पहिल्यांदा मोठ्या संख्येने असलेले बाऊंसर्स लक्ष वेधून घेत होते. सराईत गुन्हेगाराच्या अवतीभवती बाऊंसर्सच्या घोळक्यामुळे सर्वसामान्यांना मिरवणुकीत चालताना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते.

एवढेच नव्हे तर पोलिसांसमोर शहरातील काही सराईत गुन्हेगार हे बाऊंसर्स घेऊन मिरवणूकीमध्ये वावरत होते. त्यातून या सराईत गुन्हेगारांनी समाजाला की पोलिसांना काय संदेश दिला असावा, अशीच चर्चा उपस्थितांमध्ये होती. तसेच अशा प्रवृत्तींना पोलिसांनी वेळीच अटकाव घातला पाहिजे अशीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT