Dr. Tushar Shewale esakal
नाशिक

Nashik News : डॉ. तुषार शेवाळे यांची कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त

Nashik News : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. तुषार शेवाळे यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. तुषार शेवाळे यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांच्या मान्यतेनुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी डॉ. शेवाळे यांना निवडीचे पत्र पाठविले आहे. (Dr. Tushar Shewale of Congress Appointed as State General Secretary)

कॉंग्रेसकडून धुळे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी डॉ. शेवाळे इच्छूक होते. त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून तयारी केली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने ऐनवेळी डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली.

उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या डॉ. शेवाळे यांनी कॉंग्रेसच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. (latest marathi news)

राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या जागी माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवून डॉ. शेवाळे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस नेतृत्वाकडून केला जात आहे. पक्षाने ही त्यांना पदोन्नती दिल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT