Drain cleaning in face of monsoon esakal
नाशिक

Nashik News : पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई! येवल्यात जेसीबी, पोकलेनद्वारे स्वच्छता मोहीम

Nashik News : पावसाळ्यात शहरातील प्रमुख नाले तुंबून शनिपटांगणासह इंद्रनील कॉर्नरसह बुरुड गल्लीमागील परिसरात पूर येऊन दुकाने व घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडतात.

सकाळ वृत्तसेवा

येवला : पावसाळ्यात शहरातील प्रमुख नाले तुंबून शनिपटांगणासह इंद्रनील कॉर्नरसह बुरुड गल्लीमागील परिसरात पूर येऊन दुकाने व घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. ही आपत्ती टाळण्यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेकडून नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य नाल्यांसह गटारीतील गाळ व झाडे-झुडपे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा केला जात आहे. (Nashik Drain cleaning in face of monsoon)

नगर परिषदेने मॉन्सूनपूर्व कामांतर्गत नालेसफाईच्या कामास सुरुवात केलेली असून, आतापर्यंत अमरधाम नाला, विक्रांती हॉटेलच्या पाठीमागे, कोर्ट रोड, शहा कॉलनी, बस स्टॅन्ड व इंद्रनील कॉर्नरजवळचा नाला पोकलेन मशीनने साफ केलेला आहे. नाल्यातील गाळ व झाडाझुडपांमुळे पाण्याचा प्रवाह अडून पाणी शहरांमध्ये घुसू नये याकरिता नगर परिषदेने मॉन्सून सुरू होण्याआधीच शहरातील सर्व मोठे नाले पोकलेन मशीनने साफ करण्याचे नियोजन केलेले आहे.

यामध्ये दराडे पुलाजवळील नाला शुभकामना हॉटेल, फत्तेबुरूज, हुडको, लोखंडी पूल ते थेट रोकडोबापर्यंतच्या नाल्यासह इतर नाले साफ केले जाणार आहेत. हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरु करण्यात आलेली आहेत.

तसेच, प्रत्यक्ष नियंत्रणात सफाई मोहिम सुरु असून सफाई कर्मचारी, जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे, उघडी गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. (latest marathi news)

नालेसफाई अंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असून, याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या दुकानांत व घरांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा मिळेल. शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफसफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच, नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपे व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

मुख्याधिकारी किरण देशमुख, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता रूपाली भालेराव, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे, मुकादम देविदास लाहूंडे व केशव बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नालेसफाईचे काम सुरु आहे.

"नाल्यातून जाणारे पावसाचे पाणी शहरात जाऊ नये, यासाठी आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नाले व गटारीमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून चॉकअपची समस्या निर्माण होत आहे. नागरिकांनी व व्यावसायिकांनी कोणत्याही परिस्थितीत नाल्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीमध्ये कचरा टाकावा." - किरण देशमुख, मुख्याधिकारी, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT