फोटो : H33719
नाशिक : सामंजस्य कराराप्रसंगी अनिल चंडालिया व राहुल जगताप.
---
ड्रोन डिलिव्हरीचे स्वप्न
साकारणार नाशिकचे स्टार्टअप्स्
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : तंत्रज्ञानाधारित लॉजिस्टिक्स स्टार्टअप वाहतूक प्रायव्हेट लिमिटेडने ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड (पीडीआरएल) सोबत सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत ड्रोन डिलिव्हरीच्या चाचण्या घेत राज्यात ही संकल्पना साकारण्यात दोन्ही संस्था सामंजस्याने काम करणार आहेत. २०२८ पासून प्रत्यक्ष ड्रोन डिलिव्हरी करण्याचा कंपन्यांचा मनोदय आहे.
पीडीआरएलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल बीएलव्हीडी येथे आयोजित कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कंपनीच्या सहसंस्थापक मानसी गायकवाड, राहुल जगताप यांनी पीडीआरएलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चंडालिया यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
सामंजस्य कराराद्वारे वाहतूक डिलिव्हरी व्यवस्थेमध्ये भविष्यात ड्रोनचा समावेश करण्याच्या दृष्टीने काम करेल. आगामी काळात यासंदर्भात तांत्रिक चाचण्या आणि आवश्यक नियोजन केले जाणार आहे. पारंपरिक वाहनांसोबत आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे भविष्यात डिलिव्हरीच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात. नागरिक, व्यापारी आणि उद्योगांना अधिक आधुनिक लॉजिस्टिक्स पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वाहतूकचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. कराराप्रसंगी इस्कॉन, नाशिकचे अध्यक्ष कृष्णधन दास उपस्थित होते.