Shepherds cutting neem leaves for sheep esakal
नाशिक

Nashik News : चारा छावण्यांची आशाही मावळली! ना डोंगरावर गवत ना पठारावर चारा

Nashik : पाऊसच नसल्याने सद्यस्थितीत डोंगरासह गायरानावर कुरण उऱलेले नाही. याशिवाय थोड्याबहुत पावसामुळे हाती आलेल्या पिकामुळे उपलब्ध असलेला चाराही संपुष्टात येत असल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

संजीव निकम,नांदगाव

Nashik News : पाऊसच नसल्याने सद्यस्थितीत डोंगरासह गायरानावर कुरण उऱलेले नाही. याशिवाय थोड्याबहुत पावसामुळे हाती आलेल्या पिकामुळे उपलब्ध असलेला चाराही संपुष्टात येत असल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या नांदगाव तालुक्यातील पिकांची अंतिम पैसेवारी छत्तीस पैसे असताना व हातचा खरीप वाया गेला असतानाही तालुक्यात मात्र चाऱ्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्ह्याला सादर करण्यात आल्याने यंदाच्या दुष्काळसदृश्यतेत चारा छावण्या सुरु होण्याची शक्यता धूसर बनली आहे. (nashik drought like situation in nandgaon possibility of starting fodder camps has become gray marathi news)

तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनले असल्याच्या पार्श्वभूमीवर आता जनावरांच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र तालुक्यातील पशुधनासाठी आवश्यक असणारी चाऱ्याची गरज भागविण्यासाठी बऱ्यापैकी चारा उपलब्ध असल्याचा अहवाल तालुका कृषी विभागाने दिला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

पाऊस कमी झाल्यामुळे खरिपाचे उत्पन्न जेमतेम आल्याचे मान्य करणाऱ्या कृषी विभागाला सध्या उपलब्ध असलेला चारा पुरेसा वाटत असल्याने नजीकच्या काळात करावयाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून चारा छावण्या सुरु होण्याची शक्यता त्यामुळे धूसर बनली आहे. तालुकास्तरीय महसूल यंत्रणेच्या गाफीलपणामुळे तालुका दुष्काळी म्हणून घोषित झाला नव्हता, मात्र त्यानंतर तालुक्यातील आठ महसूल मंडळाचा दुष्काळसदृशय यादीत उशिराने समावेश झाला.

तालुकास्तरीय बेपर्वाईचा अनुभव पदरी असताना आता जनावरांच्या छावण्या सुरु करण्याला तांत्रिकदृष्ट्या अडथळा उभा राहिला आहे. याबाबत तालुका कृषी विभागाकडे संपर्क साधला असता खरीप अहवाल हा पन्नास टक्क्याच्या आतील असून चाऱ्याबाबत अधिकृत कुठलाही अहवाल कृषी विभागाने सादर केला नसल्याचा बचाव तालुका कृषी अधिकारी आर. जी. डमाले यांनी केला आहे. तालुका पशुवैद्यकीय विभागातल्या आठ मंडळातील पशुधनाची संख्या व त्यासाठी लागणारा चारा याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती या विभागातील जबाबदार सूत्रांनी दिली.(latest marathi news)

असा लागतो दररोजच चारा

शेळ्यामेंठ्या वगळता लहान जनावरांना प्रतिदिन साडेसात किलो चारा लागतो. मोठ्या जनावरांना प्रतिदिन पंधरा ते वीस किलो चारा गरजेचा आहे. तालुक्यातील लहानमोठ्या जनावराची संख्या सव्वा लाखाच्या आसपास असल्याचे पशु जनगणनेतून पुढे आले आहे. लहानमोठय़ा जनावरांचा विचार करता तालुक्यात दररोज १२ लाख ते तेरा लाख किलो इतका चारा अपेक्षीत आहे.

लहान जनावरांना प्रतिदिन चाळीस लिटर तर मोठय़ा जनावरांना ऐंशी लिटर इतके पाणी लागते, पाण्याच्या या गणितानुसार चाळीस ते पन्नास लाख लिटर पाणी हवे आहे. प्रतिमाह चाऱ्याची आवश्यकता १२ हजार ते चौदा हजार ७८० मेट्रिक टनाची आहे.

''तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने आता दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. तालुक्यांत जनावरांना कुठल्याही प्रकारचा चारा नाही. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती होती, त्यांनी शेजारच्या येवला तालुक्यातून व इतरत्र तालुक्यातून चारा विकत आणला, पण ९० टक्के लोकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने आजही त्यांचे चाऱ्याअभावी प्रचंड हाल होत आहे. तालुक्यात जनावरे वाचविण्यासाठी लोकांची कसरत सुरू आहे, यावर तत्काळ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करणे आवश्यक आहे.''- बापूसाहेब कवडे, ज्येष्ठ नेते, नांदगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT