नाशिक

सोमवारची मुलाखत : निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत

CD
लोगो : सोमवारची मुलाखत -------------------------------- फोटो : H32008 प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचविणार निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत : धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाला फटका बसला आहे. सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १२ उपाययोजना लागू केल्या आहेत. जिल्ह्यात या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे. नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामे वेगाने सुरु आहेत. संभाव्य टंचाईच्या अनुषंगाने धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना दिली. - गौरव जोशी -- प्रश्‍न : जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाची तयारी काय? रोहितकुमार राजपूत : यंदा खरीप हंगामात ६ लाख ५१ हजार हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १०१ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली. पण, पेरणी चांगली होऊनही पावसाने ओढ दिली. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत अपेक्षित पावसाच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला. इगतपुरी, येवला, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यांत ही तूट अधिक आहे. दुष्काळासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या मागदर्शक सूचनांनुसार नियोजन व अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. --- दुष्काळ निवारणासाठी कोणत्या उपाययोजनांवर भर असणार? : राज्य सरकारने ट्रिगर-१ मध्ये जिल्ह्यातील पंधरापैकी १० तालुक्यांचा समावेश केला आहे. या तालुक्यात लागू केलेल्या १२ सवलतींवर भर दिला जात आहे. जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपाच्या वीजबिलात सवलत आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ या प्रमुख सवलतींचा समावेश आहे. तसेच जी रामजी योजनेतून सध्या ५ हजार ६०० कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच ११ हजारांहून अधिक कामे शेल्फवर तयार आहेत. तसेच जनावरांसाठी जिल्ह्यात चार महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. हा चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी चारा वाहतूक बंदीचा आदेश काढणे विचाराधीन आहे. --- उर्वरित पाच तालुकेही दुष्काळी घोषित करण्यासाठी आक्रमक आहेत. : सरकारने खरीप हंगामात दुष्काळाची पहिली कळ लागू केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला आणि देवळा या १० तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड आणि चांदवड या ५ तालुक्यांतही अनेक महसूल मंडळांत पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांचाही समावेश व्हावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. --- पीक नुकसानीच्या पंचनाम्यांची सद्यःस्थिती काय आहे? : जिल्ह्यात १ हजार ३३९ गावांमध्ये पीक पंचनामे केले जात आहेत. आतापर्यंत सुमारे ४२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे कर्मचारी एकत्रितपणे हे काम करत आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कोणताही पात्र शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. --- संभाव्य टंचाईत टँकर, पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे असेल? : जिल्ह्यात सध्या मालेगाव व येवला तालुक्यातील १८ गावे आणि ३७ वाड्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अंदाजानुसार मार्च २०२७ पर्यंत सुमारे १८० आणि जून २०२७ पर्यंत सुमारे ४१५ टँकरची गरज भासू शकते. त्यासाठी तीन टप्प्यांत टंचाई कृती आराखडा तयार केला जात आहे. टँकर हा शेवटचा पर्याय ठेवताना नळयोजना पूर्ण करणे, नळयोजनांची दुरुस्ती करणे आणि हातपंप दुरुस्तींना प्राधान्य दिले जात आहे. -- दूषित पाणीपुरवठा टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत? : टंचाईच्या काळात जलस्रोत आटतात. परिणामी पाणी दूषित होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे विहिरी आणि सार्वजनिक जलस्रोतांची नियमित तपासणी करणे, पाण्याचे नमुने घेणे आणि आवश्यक तेथे शुद्धीकरण करण्याबाबत जिल्हा परिषद आणि आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना कोणताही आजार होऊ नये, हा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT