नाशिक

तीन तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग

CD
निफाड, चांदवड, त्र्यंबकेश्वरच्या दुष्काळाचा मार्ग मोकळा! २० टक्के क्षेत्रावरील पिकांचे कापणी प्रयोग; अहवाल तातडीने सादर करण्याचे सरकारचे आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी निफाड, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या तालुक्यांतील २० टक्के क्षेत्रावर पाच प्रमुख पिकांचे कापणी प्रयोग घेऊन त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होण्याची शक्यता वाढली आहे. राज्यात यंदा पावसातील खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने २६५ तालुके दुष्काळी घोषित केले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर हे पाच तालुके दुष्काळाच्या निकषात बसत नसल्याने यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे शेतकरी आणि विविध घटकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाचही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला. त्यात पावसातील खंड अर्थात ‘ड्राय स्पेल’चा निकषही विचारात घेण्यात आला आहे. नियमित निकषानुसार सलग २१ दिवस २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाल्यास तो कालावधी ‘ड्राय स्पेल’ म्हणून ग्राह्य धरला जातो. दुष्काळ व्यवस्थापनाच्या मसुद्यातील पावसाच्या खंडाच्या निकषाच्या आधारे जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची दखल घेत सरकारने पाचपैकी निफाड, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष पिकांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रब्बी हंगामाच्या तयारीपूर्वी संबंधित तालुक्यांतील २० टक्के क्षेत्रावर पिकांचे कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. या पाहणीचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. नाशिक, दिंडोरीचा प्रश्न कायम दुष्काळी घोषित झालेल्या दहा तालुक्यांना जमीन महसूल माफी, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात सवलत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा सवलती लागू आहेत. निफाड, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर यांच्याबाबत आता सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी नाशिक आणि दिंडोरी तालुक्यांचा दुष्काळी यादीतील समावेश अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील नाराजी कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT