नाशिक

अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुष्काळ निवारणासाठी मदत

CD
NSK26H34700 नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करताना राजेंद्र शुक्ला, सुनील गायमुखे, एस. आर. जगताप, सी. डी. धनक, सुनंदा जरांडे, सरिता सोनवणे, रमेश शिसव आदी. ------------- ३६-४ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिले २.४१ लाख दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृतिशील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत २ लाख ४१ हजार रुपयांचा निधी संकलित केला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर (ता.६) या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करत संबंधितांनी सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपला. जिल्ह्यातील एकूण २२२ कृतिशील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, काही सदस्यांनी दुसऱ्यांदा आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून निधी संकलित करण्यात आला. कृतिशील संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शुक्ला यांनी सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधून योगदानासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला नाशिक जिल्ह्यातील सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुनील गायमुखे, एस. आर. जगताप, सी. डी. धनक, सुनंदा जरांडे, सरिता सोनवणे, रमेश शिसव तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT