modi awas gharkul yojana sakal
नाशिक

SAKAL Exclusive : अपुऱ्या अनुदानामुळे घराचे स्वप्न अधुरे; महागाईने उसनवार करूनही घरकुलांचा खर्च परवडेना

SAKAL Exclusive : अपुऱ्या अनुदानाच्या रकमेत घरकुलाचे काम पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांची हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईना.

भाऊसाहेब गोसावी - सकाळ वृत्तसेवा

चांदवड : अपुऱ्या अनुदानाच्या रकमेत घरकुलाचे काम पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांची हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईना. अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करून अधिकचे पैसे टाकून घराचे स्वप्न पूर्ण करावे लागले. आर्थिक अडचणींमुळे घरात शांत झोप लागेना अशी घरकुल लाभार्थ्यांची स्थिती आहे. पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यांसारख्या योजनांतून गरजू, गरीब व ज्यांना राहण्यासाठी पक्कं घर नसलेल्यांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १ लाख ४८ हजार रुपये अनुदान तीन चार टप्प्यांत विभागून दिले जाते. (Due to insufficient subsidy dream of house is unfulfilled despite inflation cost of houses cannot be afforded )

या अनुदानातून कमीत कमी दोनशे चौरस फूट नवीन पक्कं घर या लाभार्थ्यांनी बांधणे आवश्यक असते. प्रचलित दरानुसार साधं पत्र्याचे घर जरी बांधायचे ठरवले तरी साधारपणे २७० चौरस फूट घराचे बांधकाम करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये लागतात.

दहा वर्षापासून तेच अनुदान

दहा वर्षापूर्वी ही अनुदानाची रक्कम तीच होती अन् आजही अनुदानाची रक्कम तीच आहे. मात्र याच दहा वर्षात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत व मजुरीत अंदाजे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी, अनुदान वाढत नसल्याने बांधकाम पूर्ण करता येत नसल्याचे चित्र आहे. घरकुलाचे लाभार्थी शेतमजूर असल्याने मजुरी करतील तेव्हा कुटुंब चालवतील असे आहेत. तरीही अनेक लाभार्थ्यांनी हात उसनवारी करून, व्याजाने पैसे घेऊन बांधकाम पूर्ण केले आहे. तरीही अनेकांना अजूनही अनुदानाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. बांधकामासाठी जी अतिरिक्त रक्कम फेडावी की कुटुंब चालवावे अशी विवंचना आहे. (latest marathi news)

३०० फूट बांधकामाचा खर्च

पत्र्याचे घर - ८०० प्रति चौरस फूट दरानुसार २४००००

स्लॅबचे घर - १३०० प्रति चौरस फूट दरानुसार ३९००००

''पत्र्याच्या तिनशे चौरस फूट घराच्या बांधकामासाठी मजुरीसह अडीच तीन लाख रुपये लागतात. मी अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम करतो. पैशांअभावी अनेकांचे बांधकाम दोन दोन वर्षेही पूर्ण होत नाही. अनुदानाची रक्कम वाढवून दिली तरच चांगलं अन् पक्कं घर बांधता येईल.''- संदीप आहिरे , बांधकाम कारागीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT