नाशिक

नाशिक बंगाली असोसिएशनतर्फे वृंदावन लॉन्स येथे आयोजन

CD
नाशिकमध्ये १६ ऑक्टोबरपासून दुर्गापूजा महोत्सव बंगाली असोसिएशनतर्फे आयोजन; विविध कार्यक्रमांची मेजवानी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : नाशिक बंगाली असोसिएशनतर्फे दुर्गापूजा महोत्सवाचे आयोजन १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान केले आहे. आनंदवल्ली येथील गंगापूर रस्त्यावरील सेरेन मेडोजच्या समोर असलेल्या वृंदावन लॉन्स येथे हा महोत्सव होणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना अनुभवता येणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंगाली समाजात दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. देवी दुर्गेच्या आगमनाचा आनंद, पारंपरिक पूजा, ढाक या वाद्याचा निनाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो. यंदाही नाशिक बंगाली असोसिएशनने महोत्सवाचे नियोजन केले असून, नागरिकांनी कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी (ता. १६) महाषष्ठीच्या पूजेने होणार आहे. शनिवारी (ता. १७) महासप्तमी, रविवारी (ता. १८) महाअष्टमी, सोमवारी (ता. १९) महा नवमी अष्टमीचे धार्मिक विधी, मंगळवारी (ता. २०) महानवमी आणि बुधवारी (ता. २१) महादशमी साजरी केली जाणार आहे. या काळात महापूजा, पुष्पांजली, संध्या आरती, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध पारंपरिक धार्मिक विधी होतील. महाअष्टमीच्या दिवशी विशेष पूजा आणि संधीपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महादशमीला अपराजिता पूजा, सिंदूर उत्सव आणि विजयादशमीच्या पारंपरिक सोहळ्याने उत्सवाची सांगता होईल. याशिवाय २५ ऑक्टोबरला कोजागरी लक्ष्मीपूजा आणि २५ जानेवारी २०२७ रोजी सरस्वतीपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत भट्टाचार्य, उपाध्यक्ष शेखर दत्ता, सरचिटणीस अमिताभ चक्रवर्ती आणि खजिनदार कल्लोल पुरकाईत यांच्यासह महोत्सव आयोजन समिती कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT