Nashik E-rickshaws sakal
नाशिक

नाशिक : देवळाली कॅम्पच्या गल्लीतून ई- रिक्षा उचलणार कचरा

देवळाली कॅम्प स्वच्छता अभियानात देशपातळीवर चौथा शहर स्वच्छतेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम.

सकाळ वृत्तसेवा

देवळाली : देवळाली कॅम्प स्वच्छता अभियानात देशपातळीवर चौथा, तर राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने घंटा गाड्यांबरोबरच आता कचरा संकलनासाठी ई- रिक्षाचा प्रयोग सुरू केला आहे. संपूर्ण देशात देवळालीची ओळख आरोग्यदायी वातावरण, स्वच्छ व सुंदर शहर अशी असल्याने ती जपण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे.

‘स्मार्ट कॅन्टोन्मेंट’ कडे वाटचाल करणाऱ्या प्रशासनाने तीन वर्षापासून अकरा घंटागाड्यांच्या माध्यमातून सर्व आठही वॉर्डात सुका व ओला कचरा संकलनाचा उपक्रम राबवताना जास्ती- जास्त घरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही गल्लीबोळातील घरापर्यंत पोचणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर गतवर्षी सायकल रिक्षाचा प्रयोग करण्यात आला.

मात्र, यंदा ई- रिक्षा व कार्ट यांच्या माध्यमातून अशा घरापर्यंत पोचणार आहेत. या कामासाठी स्वतंत्र दोन वाहनांची तजवीज केली आहे. त्याचा शुभारंभ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी उमेश गोरवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आरोग्य अधिक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, पर्यवेक्षक सुभाष काडेकर आदी उपस्थित होते.

ज्या भागात घंटागाडी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी ही गाडी जाऊन कचरा संकलित करेल. याशिवाय ओला व सुका कचऱ्यासाठी या गाडीत देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सदर गाडी ही चार्जिंगवर असल्याने तिचा पेट्रोल- डिझेलचा खर्च तसेच कर्मचाऱ्यांचा वेळदेखील वाचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur BJP : भाजप तालुका पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, अपहार केल्याचा आरोप सहन झाला नाही अन्

Post-COVID Cancer Surge: कोरोनानंतर कर्करोगाचे सावट! सोलापुरात रुग्णसंख्या दुपटीने, म.फुले योजनेत केमोथेरपीचे प्रमाण वाढले

CM Relief Fund:'सोलापुरातील कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 कोटी मिळणार': मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

IPL vs ICC : प्रत्येकी ५८ कोटी! दोन खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची अट...

Latest Marathi News Live Update : आमदार राहुल कुल यांचा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत सुपूर्द

SCROLL FOR NEXT