Edible oil prices sakal
नाशिक

Edible Oil Price Hike : आखाती देशांतील युद्धामुळे तेल दरवाढ

Oil Price Hike : इराण युद्धामुळे गत सप्ताहात खाद्यतेलाच्या दरात ३ ते ५ रुपये दरवाढ झाली. वनस्पती तुपाच्या दरात १५ ते २० रुपये लिटर मागे दरवाढ झाली आहे.

नीलेश छाजेड

नाशिक : इराण युद्धामुळे गत सप्ताहात खाद्यतेलाच्या दरात ३ ते ५ रुपये दरवाढ झाली. वनस्पती तुपाच्या दरात १५ ते २० रुपये लिटर मागे दरवाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात तेलाबरोबर वनस्पती तुपाचीही मागणी वाढते. कच्च्या तेलाच्या दरातील वाढीमुळे वनस्पती तुपाच्या दरातही तेजी आली आहे. इराण व इराक या देशांतून सूर्यफूल तेल व कच्च्या पाम तेलाची आयात केली जाते. (edible Oil prices rise due to war in Gulf countries )

गेल्या आठवड्यात तेलाच्या दोन जहाजांवरही हल्ला झाला होता त्या कारणामुळे ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यातही तेलाच्या भावात आणखी काही प्रमाणात तेजीची शक्यता आहे. सध्या नवरात्रीमुळे भगर, साबुदाणा, शेंगदाणे या उपवासाच्या पदार्थांना मागणी मोठ्या प्रमाणात असते. किरकोळ बाजार पेठेत साबुदाणा ७० ते ८० भगर १२० रुपये, शेंगदाणे १३० ते १४० रुपये, राजगिरा १२० रुपये किलो दर आहेत.

घाऊक बाजार पेठेत डाळींचे दरात तीन ते पाच रुपये किलो मागे घटले आहेत. तूर डाळ चारशे ते पाचशे क्विंटल मागे कमी होऊन १४५०० ते १५२००, मूंग डाळ तीनशे ते चारशेने कमी होऊन १०२०० ते १०७००, चना डाळ दोनशे ते अडीचशेने कमी झाले आहेत. डाळींचे दर भविष्यात साधारणतः स्थिर राहण्याचे संकेत दिले जात आहेत. (latest marathi news)

तेलाचे दर

सोया तेल एक लिटर १३० ते १३८

पाच लिटर ६८० ते ७१०

पंधरा किलो २१८० ते २२२०

सूर्यफूल तेल एक लिटर १३५ ते १४२

पाच लिटर ७१० ते ७३०

पंधरा लिटर २०८० ते २१३०

वनस्पती तूप

१५० ते १६५ रुपये लिटर

''मलेशियासह इराण व इराक या दोन्ही देशांकडून सूर्यफूल तेल व रॉ पाम तेलाची आयात होते. इराणच्या युद्धामुळे तेलाच्या दरात वाढ झाली आहे.''- रितेश बूब (घाऊक व्यापारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: हवामान विभागाचा २१ ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

SCROLL FOR NEXT