CM Eknath Shinde esakal
नाशिक

Nashik CM Shinde Daura : लवकरच शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय : एकनाथ शिंदे

Nashik News : जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे वाढवलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाबाबत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे वाढवलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाबाबत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. (Eknath Shinde statement Decision in interest of farmers soon)

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी ते नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर दहापट वाढवले आहेत. २०१८-१९ मध्ये बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी ५३८ रुपये होता.

नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी ५ हजार ४४३ रुपये, खरिपाच्या शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी १ हजार ८९०, रब्बीसाठी ३ हजार ७८० करण्यात आली आहे. एका झटक्यात दहापट झालेली ही दरवाढ बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. (latest marathi news)

मुख्यमंत्री शिंदे यांनी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही असे सांगत, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार करेल असे आश्वासन दिले आहे.

हाकेंचे आभार

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण १० दिवसांनंतर स्थगित केले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शुक्रवारी (ता. २१) आमची बैठक झाली. बैठकीत दोन समाजात तेढ निर्माण होवू नये, यासाठी चर्चा करण्यात आली. अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरविण्यात आले हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT