Nashik election delay steward power loss sakal
नाशिक

नाशिक : सत्ता गेल्याने 'कारभाऱ्यांची' वाहनेही धूळखात

निवडणूक लांबल्याने प्रशासकीय कारकीर्दीचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्ता आहे तोपर्यंतच महत्त्व, सत्ता गेली म्हणजे रवानगी अडगळीतच होते. याचा प्रत्यय सध्या महापालिकेत येते आहे. एरवी शहरभर फिरणारी महापालिकेतील कारभाऱ्यांची वाहन सध्या धूळखात पडून आहे. एरवी सकाळी दिवस सुरू झाल्यापासून लग्नकार्य, दशक्रिया विधीसह गल्लोगल्ली फिरणाऱ्या वाहनांची धूळ पुसायला कुणाला वेळ नाही. निवडणुका लांबल्याने प्रशासकीय कारकीर्द सुरू झाल्याचा हा महिमा सध्या महापालिकेत पाहायला मिळतो आहे.

महापालिकेची निवडणूक लांबल्यानंतर नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे महापौर, विविध समिती सभापतींची वाहने धूळखात पडून आहे. प्रशासकीय राजवटीत पदाधिकारी राहिलेले नाही. त्यामुळे विविध पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या वाहनांची सुविधा काढण्यात येऊन ती वाहने महापालिकेत जमा करण्यात आली आहे. मात्र, अशा वाहनांवर धूळ खाण्याची वेळ आली आहे. १३ मार्चला महापौरांसह सर्व नगरसेवकांची मुदत संपल्याने नाशिक महापालिका आयुक्त यांच्यावर शासनाने प्रशासकाची जबाबदारी दिली.

प्रशासनातर्फे महापौरांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानसह महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते तसेच विभागीय सभापती यांना देण्यात आलेली वाहन सुविधा जमा करून ताब्यात घेतली. अशा प्रकारच्या गाड्या सध्या महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात उभे करण्यात आल्या आहेत. पदाधिकाऱ्यांची वाहने जमा झाल्यानंतर त्यांच्यावर ज्या चालकांची नियुक्ती होती. त्यांच्याकडे दुसरी जबाबदारी देण्यात आल्यामुळे महापालिकेकडून लाखो रुपये खर्चून घेण्यात आलेल्या वाहने त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच राहिले नाही. यामुळे हे महागडी वाहने धूळखात पडून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT