Solar panels installed on the roof of the Shahi Mosque esakal
नाशिक

Nashik News : सौरऊर्जा माध्यमातून मशिदीमधून वीज बचतीचा संदेश

Nashik : अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करत शहरातील मशिदी हायटेक झाल्या आहेत. सौरऊर्जेपासून तर डिजिटल तंत्रप्रणालीचा वापर मशिदीत करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करत शहरातील मशिदी हायटेक झाल्या आहेत. सौरऊर्जेपासून तर डिजिटल तंत्रप्रणालीचा वापर मशिदीत करण्यात आला आहे. भद्रकाली फुले मार्केट परिसरातील शाही मशीद सौरऊर्जेचा वापर करत असल्याने १०० टक्के वीज बचत करणारी पहिली मशीद ठरली आहे. पुरातन काळात साकारलेल्या शहरातील मशिदींना अत्याधुनिक तंत्रप्रणालीची साथ मिळाल्याने बहुतांशी मशिदींनी कात टाकली आहे. (nashik Electricity saving message from mosque through solar energy marathi news)

अनेक मशिदीत नमाज पठणासाठी येणाऱ्यांना उन्हाचा चटका जाणवू नये. यासाठी वातानुकूलित यंत्र बसविले आहे. पाचही वेळेची नमाजाचे वेळापत्रक तसेच तापमान दर्शविणारे डिजिटल फलक, एलईडी लायटिंग तसेच धार्मिक एलईडी प्रतिमा, सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक साउंड सिस्टिम अशा एक ना अनेक अत्याधुनिक वस्तूंचा वापर मशिदींमध्ये करण्यात आल्याने त्यांना आधुनिकता आली आहे.

इतकेच नाही तर सौरऊर्जेचा वापरही मशिदींमध्ये करण्यास सुरवात झाली आहे. भद्रकाली फुले मार्केट येथील शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करणारी शाही मशीद पहिली मशीद ठरली आहे. यामुळे हजारो रुपयांची वीज बचत होत आहे. केवळ वीजच बचत होत नाही तर बिलापोटी जाणारी रक्कमही वाचत आहे.(latest marathi news)

त्याच रकमेचा मशिदीमधील मदरशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी वापर होत आहे. पखाल रोड येथील अहमद रजा मशीदही अशाच प्रकारे वीज बचत करत आहे. आगामी काळात शहरातील इतरही मशिदी सौरऊर्जेच्या माध्यमातून उजळणार असल्याचे बघावयास मिळेल.

उत्तम उपाय

सततच्या वीज दरवाढीवर सौरऊर्जा एक महत्त्वाचा उपाय आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यास विजेची बचत होऊन आर्थिक रक्कमही बचत होण्यास मदत होत आहे. शिवाय उन्हाळ्यात अधिक वीज तयार होत असल्याने वापरा व्यतिरिक्त उरलेली वीज वीज वितरण विभागाकडून संबंधितांकडून खरेदी केली जाते. याचादेखील अप्रत्यक्षरीत्या फायदा होत असतो. सौरऊर्जेचे महत्त्व इतरांनाही कळू लागल्याने आगामी काळात दर्गा आणि इतर मशिदीतही सौर ऊर्जेचा वापर होत असल्याचे दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT