Electricity Theft
Electricity Theft esakal
नाशिक

Nashik Electricity Theft : एक वर्षात 8 कोटीची वीजचोरी! महावितरणतर्फे शहर, जिल्ह्यात तीन हजार जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Electricity Theft : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शहर व जिल्ह्यात एका वर्षात राबविलेल्या विशेष मोहिमेंतंर्गत वीजचोरी करणाऱ्या तीन हजाराहून अधिक ग्राहकांवर कारवाई केली आहे. तीन हजार ग्राहकांनी एका वर्षात आठ कोटी रुपयांहून अधिकची वीजचोरी केली आहे. (Nashik Electricity Theft of 8 crores in one year news)

महावितरणतर्फे शहर आणि जिल्ह्यात वीजचोरी रोखण्याकरीता विशेष मोहीम राबविली जात आहे. यात जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात आली होती. एप्रिल २०२३ ते मार्च २४ अखेर या दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये महावितरणाच्या विशेष पथकाने वीज चोरी व गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.

यामध्ये नाशिक व मालेगाव मध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार २ हजार ९३२ तर कलम १२६ नुसार २३६ ग्राहक अशा एकूण ३ हजार १६८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई अंतर्गत ८ कोटी ८३ लाख रुपयाच्या वीजेचा वापर या ग्राहकांनी केला आहे.

वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंते व सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी वीज चोरी रोखण्याच्या मोहिमेत सहभाग घेऊन ही कारवाई केली.  (latest marathi news)

वीज बिल व चोरी अवैध वापर या विरोधात महावितरण गंभीर असून या आर्थिक वर्षात सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणचे विशेष भरारी पथक कार्यरत असून तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजमीटरमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई

वीजचोरीसह वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणाऱ्यावर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक मंडळामध्ये २ हजार २७२ तर मालेगाव मंडळात ६६० जणांवर कारवाई करण्यात आली.

याचबरोबर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसऱ्या कारणासाठी बेकायदेशीर वीज वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक मंडळात २०९ आणि मालेगाव मंडळात २७ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली अशा प्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार ३१६८ जणांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT