Workers breaking encroachment with hammer. esakal
नाशिक

Nashik Encroachment : कॉलेज, गंगापूर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी मोहीम! 50 पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा

Nashik News : महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २)कॉलेज रोड व गंगापूर रोड भागामध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २)कॉलेज रोड व गंगापूर रोड भागामध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी ५० अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. त्याचबरोबर अतिक्रमणधारकांकडून महापालिका खर्चदेखील वसूल केला जाणार आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. (Encroachment Campaign on College Gangapur Road for second day)

आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अतिक्रमण कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. पहिल्या दिवशी कॉलेज रोड गंगापूर रोड भागातील ५५ अतिक्रमणे उद्‌ध्वस्त केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी चाळीस अतिक्रमणे हटविण्यात आले. कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड या परिसरात सामासिक अंतर, रूफ टॉप, दुकानांसमोर उभारण्यात आलेले शेड.

वाढीव बांधकाम, बाहेरील बाजूस बांधलेले कठडे, ओटे, अतिक्रमण विभागाने उद्‌ध्वस्त केले. दुकानासमोर अनधिकृतपणे लावलेले फलकदेखील हटविण्यात आले. रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यवसायिकांचे सामान अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आले. बिग बाजार समोरील पाटील प्लाझा अपार्टमेंटमधील स्काय फाइव्ह.

गोदावरी सोसायटीतील छोटे मियाँ, हवेली हँग, ओबिया, फ्लाइंग मंक, चार्ली डेक, बहुमोल हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सामासिक अंतरातील कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएल ऑफिस ते कॉलेज रोड परिसरातील बहुमोल ज्वेलर्स, गंगापूर रोड येथील अण्णा इडली, बिग बाजार शेजारी विठ्ठल मंदिर चौकातील अनधिकृत टपऱ्या. (latest marathi news)

तुषार मिसळ परिसरातील अनधिकृत ओटी, कठडे, सागर स्वीट्स परिसरातील कठडे वाढविलेले अतिक्रमण हटविण्यात आले. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह उपायुक्त मयूर पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, रवी बागूल, समीर रकटे, दत्तू शिंगाडे, उपायुक्त नितीन राजपूत, विधी अधिकारी वणकर.

विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, सुनीता कुमावत, तुषार आहेर, अंबादास गरकळ यांच्यासह पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, मोहिमेत सहभागी झाले होते.

"शहरात अतिक्रमण मोहीम नियमित सुरू राहणार असून व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT