नाशिक

राजीव नगरमध्ये अवैध गोमांस विक्री दुकानाचे अतिक्रमण काढले

CD
फोटो : A15061, A15060 नाशिक : क्रेनच्या साहाय्याने बॅनर काढताना पथक. दुसऱ्या छायाचित्रात राजीवनगर येथील गोमांस विक्रीचे दुकानाचे काढलेले अतिक्रमण -- कमानी, पथदीपांवरील अतिक्रमण हटविले महापालिका पूर्व विभागाच्या पथकाकडून कारवाई सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २२ : महापालिका पूर्व विभागाच्या पथकाकडून इंदिरानगर भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. राजीवनगर येथील अवैध गोमांस विक्री दुकानासह विविध भागातील दिशादर्शक कमानी आणि पथदीपांवरील अनधिकृत फलकांचे अतिक्रमण काढण्यात आले. उपायुक्त सुवर्णा दखणे, विभागीय अधिकारी आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख गुणवंत वाघ आणि पथकप्रमुख भगवान सूर्यवंशी यांच्यासह पथकाकडून संबंधित दुकानांवर कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने पत्र्याचे असलेले दुकान काढून घेण्यात आले. इंदिरानगर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच विविध मंडळांकडून नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच मंडळांच्या जाहिरातीसाठी रस्त्यांवर स्वागत कमानी, बॅनर आणि होर्डिंग उभारले होते. यातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि सार्वजनिक जागांवर लावलेले फलक क्रेनच्या साहाय्याने काढून जप्त करण्यात आले. दरम्यान इंदिरानगर परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी लोखंडी कमान हटविण्यात येऊन जप्त केली. तसेच पथदीपालगत लावलेले पोल बॅनर काढण्यात आले. डीजीपी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक कमानीसह, विजय-ममता आणि सारडा सर्कल येथील दिशादर्शक कमानीवरील होर्डिंगही हटविण्यात आले. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पूर्व विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून त्वरित कारवाई करण्यात आली. सलग दोन दिवसापासून कारवाई सुरू असून यापुढे अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

Manoj Jarange: ''माझ्याकडेही एक क्लिप आहे.. पिंपरी चिंचवड...'', अजय बारस्कर यांच्याकडून जरांगे पाटलांच्या चारित्र्यावर संशय

Naming Controversy: ट्रम्प यांची सटकली! आता म्हणताहेत 'अटलांटिक महासागरालाच माझे नाव द्या!'

ABHISHEK SHARMA : पहिल्याच बॉलवर सिक्स मारताच अभिषेक शर्माच्या नावावर मोठा विक्रम; शफिकुल्लाहचा रेकॉर्ड मोडला, सूर्या कितव्या नंबरवर?

'माझ्यावर होणाऱ्या मीम्सवर मीही हसतो'; सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...'ही माझी पोरं'

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

SCROLL FOR NEXT