Pandit Taufiq Qureshi with plastic band ensemble of students performing at Espalier School. In second photograph, a world record of a musical activity is recorded
Pandit Taufiq Qureshi with plastic band ensemble of students performing at Espalier School. In second photograph, a world record of a musical activity is recorded esakal
नाशिक

Nashik News : ‘इस्पॅलियर’च्या विद्यार्थ्यांचा वादनातून जागतिक विक्रम; रिसायकल प्लॅस्टिक बॅन्डचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एका तालात वाद्यवादन करताना निर्माण होणारा निर्मलध्वनी नाशिककरांना अनुभवायला मिळाला. ‘रिड्यूस’, ‘रियुज’ आणि ‘रिसायकल’ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतांना प्लॅस्टिकच्या वस्तूंवर प्रक्रियेद्वारे इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्‍या परकेशन बॅन्डचे लयबद्ध सादरीकरण शनिवारी (ता. २४) झाले.

एक हजार २५० विद्यार्थी आणि २६३ शिक्षक, कर्मचाऱ्यांनी एकत्रितरीत्‍या केलेल्‍या सादरीकरणाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. (Nashik Espalier students world record in music)

जेम्बे वादक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांची उपस्‍थिती या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पकतेतून साकारलेल्‍या या प्लॅस्टिक बॅन्डद्वारे संगीतासोबत सामाजिक बांधिलकीचीही जाणीव विद्यार्थ्यांनी करून दिली.

प्रत्येक गोष्टीत संगीत, सूर, कला असून, ती निर्माण करण्याची, ओळखण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची क्षमता निर्माण व्‍हावी, असा संदेशही या वेळी दिला. विद्यार्थ्यांनी हीच कला प्लॅस्टिकच्या बँडद्वारे शोधत केलेल्या सर्जनशील नवनिर्मितीचे कौतुक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांनी केले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या बॅन्डला सर्व स्तरातून चांगली दाद मिळाल्यानंतर शनिवारी (ता. २४) सायंकाळी पाचला शाळेतील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी प्लॅस्टिक बॅन्डचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इस्पॅलियर स्कूलच्या यू-ट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या अनोख्या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक डॉ. मनोज तत्वादी यांनी घेतली. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी म्‍हणाले, की पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

नवीन पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळावे, आपल्या कृतीतून पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा संदेश देण्यासाठी प्लॅस्टिकच्या विविध वस्तूंच्‍या वापराने सांगितिक बॅन्ड साकारला. प्लॅस्टिकचा कमी वापर करा, पुनर्वापर तसेच पुनर्निर्मिती असा संदेश देण्याचा प्रयत्न याद्वारे केला. सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची शपथ घेतली.

कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने झाली. अध्यक्षा डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापक अंकिता कुर्या, वैशाली जालिहालकर, सबा खान उपस्थित होते. संगीतशिक्षक अविनाश गांगुर्डे, विकी रोहम, नरेश लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना साथ दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Gold Reserve: चार महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी; आरबीआय इतके सोने का खरेदी करत आहे?

Bomb Threat: बेंगळुरुमधील नामांकित 3 हॉटेल्स हाय अलर्टवर; बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी

Latest Marathi News Update: सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी बालावले

Salman khan Firing: जेलमध्ये जीवन संपवलेल्या अनुजचा पोस्टमार्टम अहवाल अपुरा? राज्य सरकारवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

PM Modi Temple: असे मंदिर जिथे सकाळ-संध्याकाळ होते पंतप्रधान मोदींची पूजा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार

SCROLL FOR NEXT