nashik smartcity  sakal
नाशिक

नाशिक : खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा

स्मार्टसिटीच्या कामांमुळे व्यावसायिक, नागरिक वेठीस

युनूस शेख :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांनी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे. वाहतूक कोंडीची सर्वाधिक समस्या निर्माण होत आहे. जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. नियोजनशून्य काम असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

शहराच्या सौंदर्यात वाढ व्हावी, यासाठी स्मार्टसिटीअंतर्गत विविध कामे केली जात असले, तरी नियोजनशून्य कामांमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या जाणवत आहे. पंचवटी, सीबीएस, शालिमार, जुने नाशिक यांसह शहराच्या विविध भागांत स्मार्टसिटीचे कामे सुरू असून, रस्ते खोदून ठेवले आहेत.

बहुतांशी ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी असलेली सिग्नल पूर्ववत सुरू आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. कोंडीने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आतहे. नोकरीवर जाणारे चाकरमाने, महत्त्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना वेळेत नियोजित ठिकाणी जाणे शक्य होत नाही. बऱ्याच वेळेस रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंबासह अन्य आपत्कालीन वाहनांना वाहतुकीच्या कोंडीस सामोरे जावे लागत असल्याचे चित्र जागोजागी बघावयास मिळते.

पर्यायी मार्ग लांब पल्ल्यांचे असल्याने वाहतुकदारांचे इंधन अधिक खर्चिक होत आहे. त्यांच्या खिशालाही झळ बसत आहे. एकूणच वाहनधारकांसह पायी मार्गक्रमण करणारे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. नको ते स्मार्टसिटीची कामे, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

व्यवसायावर परिणाम

बाजारपेठ, गावठाण परिसर, शहराचे मुख्य भाग अशा सर्व ठिकाणी स्मार्टसिटीअंतर्गत एकाच वेळी कामे सुरू आहेत. त्याठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोंडीपासून वाचण्यासाठी नागरिक पर्यायी मार्ग शोधून कोंडीच्या ठिकाणी खरेदीस जाणे टाळत आहेत. बहुतांशी व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. तीन ते चार दिवस व्यावसायिकांची बोहणी होत नसल्याच्या तक्रारी व्यावसायिक करीत आहेत.

बेशिस्त वाहतूक पार्किंग

स्मार्टसिटीअंतर्गत कामे सुरू असल्याने कामानिमित्त शहरात येणारे नागरिक व खरेदीसाठी बाजारपेठेत येणारे नागरिक मिळेल त्याठिकाणी आपली वाहने बेशिस्त पार्क करतात. एकीकडे खड्डे, तर दुसरीकडे बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT