nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : गोडसेंसह 4 उमेदवारांना खर्च निरीक्षकांची नोटीस

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला तरी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह अन्य तीन उमेदवारांना खर्च निरीक्षकांनी पुन्हा नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला तरी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह अन्य तीन उमेदवारांना खर्च निरीक्षकांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. गोडसेंना उद्योगमंत्र्यांच्या सभेचा खर्च सादर करण्याचे, तर वाजेंना बाईक रॅलीचा खर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील ३१ उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शनिवारी (ता. १८) शासकीय विश्रामगृहात झाली. (Expenditure inspectors notice to 4 candidates)

या वेळी खर्च निरीक्षक प्रवीण चंद्रा, सागर श्रीवास्तव यांसह जिल्हा नोडल अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, संपर्क अधिकारी विजयकुमार कोळी, सुरेश महंत, दत्तात्रेय पाथरुट, एन. व्ही. कळसकर, प्रकाश बानकर, चैतन्य परदेशी, अनिल कोमजवार, सुभाष घुगे, विनोद खैरनार, किशोर पवार, सुनील कोतवाल, प्रशांत घोलप उपस्थित होते.

नाशिकमधील ३१ पैकी २८ उमेदवारांनी खर्च सादर केला. भाग्यश्री अडसूळ, अमोल मेढे व झुंझार आव्हाड यांनी खर्च सादर न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावली आहे. गोडसेंच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये दोन दिवस सभा घेतली. त्याचा खर्च गोडसेंनी सादर केलेला नाही. त्यांना हा खर्च सादर करण्याची नोटीस बजावली आहे. (latest marathi news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मेळाव्याचा खर्च सादर केला आहे. वाजेंनी विनापरवानगी बाईक रॅली काढली. या रॅलीचा खर्च त्यांनी सादर केला आहे. मतदानानंतर अंतिम खर्च सादर करण्याचे आदेश खर्च निरीक्षकांनी दिले आहेत.

उमेदवारनिहाय खर्च

राजाभाऊ वाजे : ६१ लाख ९ हजार ९६८

हेमंत गोडसे : ५३ लाख ४५ हजार ६७३

सिद्धेश्वर स्वामी : १७ लाख ७१ हजार २९३

शांतिगिरी महाराज : १५ लाख ६५ हजार १७५

करण गायकर : सहा लाख ५१ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : सरकार मद्य विक्रीचे नवीन परवाने देणार, महाविकास आघाडी आक्रमक

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT