Praveen Shewale here spraying water on his shed with a cover and sprinkler
Praveen Shewale here spraying water on his shed with a cover and sprinkler esakal
नाशिक

Nashik News : पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट; खामखेडा येथील शेतकऱ्याचा प्रयोग ठरतो फायदेशीर

सकाळ वृतसेवा

Nashik News : सध्या कसमादे परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. पक्ष्यांचे तीव्र उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून खामखेडा येथील शेतकरी प्रवीण शेवाळे व नितीन शेवाळे यांनी पोल्ट्री शेडवरती कोरडा चारा, पाचट व तापमान नियंत्रणासाठी पत्र्यावर स्प्रिंकलरने पाण्याची फवारणीची उपाययोजना केली आहे. यामुळे पक्ष्यांना गारवा मिळत असून तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत आहे. (experiment of farmers from Khamkheda is profitable in summer)

कसमादे भागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती, त्यातच तापमानाने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे शेती तसेच शेती पूरक व्यवसायांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी तेजीत चालणारे पोल्ट्री उद्योग दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडले आहेत. यावर्षी दुष्काळामुळे पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे.

प्यायलाही अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे, अशा स्थिती पोल्ट्री वाचविण्याचे आव्हान असून त्यासाठी विविध मार्ग काढले जात आहेत. सर्वत्र जलस्रोत कोरडे पडल्याने विकतचे पाणी आणूनही पाण्याची पुरेशी तजवीज होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पोल्ट्रीशेड बंद आहेत तर अनेक व्यावसायिकांनी मार्चनंतर शेडमध्ये पक्षी टाकणे बंद केले आहे. (latest marathi news)

उष्माघाताने पक्षी दगावतात, त्यामुळे खर्च व मशागत होऊनही आर्थिक नुकसान होते. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा या धास्तीने पोल्ट्री व्यावसायिक त्रस्त आहेत. आता चाळीसवर गेलेल्या तापमानाने उन्हाच्या तीव्रतेने पक्षी मोठ्या प्रमाणावर दगावतात. यामुळे बहुतांश शेतकरी पोल्ट्रीत उन्हाळ्यातील हंगामात पक्षी टाकत नाहीत. मात्र नेमक्या याच काळात दोन पैसे होतील या हिशोबाने काही शेतकरी पोल्ट्रीत पक्षी टाकत उत्पादन घेतात.

खामखेडा येथील प्रवीण शेवाळे व नितीन शेवाळे यांनीही पोल्ट्री शेडमधील तापमान नियंत्रणासाठी पत्र्यांवर मक्याचा कोरडा चारा, पाचटाचे आच्छादन घातले आहे. तसेच पत्र्यावर दिवसभर स्प्रिंकलरने पाण्याचा शिडकावा करत तापमान नियंत्रित केले आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे कोंबड्या मोठ्या प्रमाणावर दगावत असल्याने या व्यवस्थेमुळे पक्षी दगावण्याचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

''पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर पाचट अंथरल्याने व स्प्रिंकलरने पाणी सोडल्याने उन्हाची तीव्रता कमी होऊन पक्षांना उष्माघाताचा धोका कमी असतो.''- प्रवीण शेवाळे, पोल्ट्री व्यावसायिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT