RET Admission esakal
नाशिक

RET Admission : आरटीई अर्जासाठी 4 जूनपर्यंत मुदतवाढ; जिल्‍हास्‍तरावर 13 हजार 639 अर्ज

RET Admission : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाच्‍या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शुक्रवारी (ता. ३१) अंतिम मुदत होती.

सकाळ वृत्तसेवा

RET Admission : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाच्‍या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शुक्रवारी (ता. ३१) अंतिम मुदत होती. या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, येत्‍या ४ जूनपर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. दरम्‍यान, आतापर्यंत नाशिक जिल्ह्या‍च्‍या स्‍तरावर १३ हजार ६३९ अर्ज दाखल झाले आहेत. ( Extension of deadline for RTE application till June 4 )

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता आरटीई योजनेंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. न्‍यायालयाच्‍या सूचनेनुसार खासगी शाळांचा समावेश या योजनेंतर्गत गेल्‍या १७ मेपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली होती. यापूर्वी जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार शुक्रवारपर्यंत ही मुदत दिलेली होती.

या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देत असल्‍याचे परिपत्रक शिक्षण संचालकांनी जारी केले आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना ४ जूनपर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी व अर्ज करता येईल. दरम्‍यान, ही अंतिम मुदतवाढ असून, यापुढे कोणत्याही परिस्‍थितीत मुदतवाढ मिळणार नसल्‍याचे परिपत्रकाच्‍या माध्यमातून स्‍पष्ट करण्यात आले आहे. (latest marathi news)

अशी आहे नाशिक जिल्ह्याची स्‍थिती

नाशिक जिल्ह्यात ४२८ शाळांच्‍या पाच हजार २७१ जागा उपलब्‍ध आहेत. या जागांकरिता १३ हजार ६३९ अर्ज दाखल झालेले आहेत. आता चार दिवसांची मुदतवाढ दिल्‍याने दाखल अर्ज संख्येत आणखी भर पडेल.

प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्‍हान

दोन वर्षांपूर्वी आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया बारगळली होती. त्‍यामुळे एकीकडे शाळांना जूनमध्ये सुरवात होऊनही प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्‍हती. गेल्या वर्षी मात्र प्रवेशप्रक्रिया सुरळीतरीत्या पार पडली. असे असले, तरी यंदा मात्र पुन्‍हा प्रवेशप्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्‍हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT