Crime News esakal
नाशिक

Nashik Extortion Crime News : निवडणुकीचा प्रचार करायचा तर पैसे द्या! दोघा सराईतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी मुख्य संशयिताला अटक केली असून, पोलिस दुसऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Extortion Crime News : जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा असेल तर आम्हाला पैसे दयावे लागतील, असा दम देत खंडणीची मागणी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांविरोधात नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयिताला अटक केली असून, पोलिस दुसऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत. (Nashik Pay money to campaign for elections case of extortion registered news)

निलेश पेखळे (रा. मोरे मळा, जेलरोड), विशाल चाफळकर (रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) अशी संशयितांची नावे असून, पेखळे यास पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगरप्रमुख शिवाजी लहू ताकाटे (रा. ज्ञानेश्वरनगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते शनिवारी (ता.२०) जेलरोड परिसरातील कुबेर कॉर्नरमधील शॉपमध्ये होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासह उमेदवाराचा जेलरोड, मोरे मळा परिसरात प्रचाराचे नियोजन करीत होते. त्यावेळी संशयित पेखळे, चाफळकर तेथे आले. दोघांनी ताकाटे यांच्याशी वाद घालून ‘आमच्या मोरे मळा भागात लोकसभा निवडणूक प्रचार करायचा असेल तर, एकवीस हजार रुपये रोख खंडणी द्यावी लागेल’ असा दम दिला.

यानंतरही दोघांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्रे दाखवून ताकाटे यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर ताकाटे यांनी नाशिकरोड पोलीसात तक्रार दिली. यासंदर्भात गुन्हा दाखल होत असतानाच, नाशिकरोड पोलीसांनी संशयित पेखळे यास ताब्यात घेत अटक केली. तर, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ते दिल्ली, राजकीय घडामोडींपासून हवामानापर्यंत; एका क्लिकवर वाचा देश-विदेशातील टॉप अपडेट्स

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT