Rahul Thete esakal
नाशिक

Nashik News : सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकानी उचलले टोकाचे पाऊल; पत्नीसह सासरच्या त्रासाचे कारण

Nashik : गिरणारे येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाने पत्नी आणि सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गिरणारे येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाने पत्नी आणि सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत युवकाच्या आईच्या फिर्यादीनुसार, नाशिक तालुका पोलिसांत संशयित पत्नीसह सासरच्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल गणपत थेटे (रा. गिरणारे) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या आई सरिता थेटे यांच्या फिर्यादीनुसार राहुलचा विवाह २०२१ मध्ये भगूर येथील पल्लवी हिच्याशी झाला होता. (Extreme step taken by software engineer youth)

मात्र, विवाहानंतर ती पती व सासूशी वाद घालत असे. तसेच, राहुल याच्यावर खोटे आरोप करीत स्वत:च्या जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकीही देत असे. त्याचप्रमाणे, तिच्या माहेरकडील मंडळीही राहुलला शिवीगाळ करीत धमकावत होते. गेल्या १५ तारखेला पुन्हा पती-पत्नीत वाद झाले होते. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर राहुल याने वरच्या खोलीत जाऊन स्वत:ला गळफास लावून घेतला.

आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात त्याने पत्नीसह सासरच्या मंडळींची नावे लिहिली आहेत. तसेच, संशयित पत्नीकडून मारहाणीचेही व्हिडिओ आहेत. त्यानुसार, पत्नी पल्लवी, सासरा नंदू रामनाथ हारक, सासू अनिता, मेहुणा अंकेश, पल्लवीचा मावस मामा रामदास शिवदास धांडे, मावस मामी माधुरी रामदास धांडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT