नाशिक

नाशिकमध्ये स्फोटाची सोशल मीडियावर अफवा

CD
नाशिकमध्ये स्फोटाचा बनावट व्हिडिओ व्हायरल तरुणाला अटक; इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे खळबळ; सायबर पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१४ : नाशिकमध्ये दोन ठिकाणी स्फोट झाल्याचा बनावट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी दिनेशकुमार गिरीधारी रजक (वय २३, मूळ रा. झारखंड) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान ‘उज्जैन गँगस्टर महाकाल’ या इन्स्टाग्राम खात्यावर नाशिकमध्ये दोन ठिकाणी स्फोट झाल्याचा मॉर्फ केलेला बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. सायबर पोलिसांच्या गस्तीवेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध घेण्यात आला. मूळचा झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्याचा रहिवासी असलेला रजक रोजंदारीवर काम करतो. तो सध्या कॉलेज रोड परिसरातील डिसूझा कॉलनीत भाड्याने राहतो. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. कोट सोशल मीडियावर अफवा पसरविणारे मजकूर, व्हिडिओ किंवा छायाचित्रे प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह बाबींवर पोलिसांची करडी नजर असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : दुष्काळ आणि नापिकीच्या विवंचनेतून चंद्रपुरात ३५ वर्षीय शेतकऱ्याने संपवले जीवन

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT