Water coming down the well near the house of Bapu Shelar at Yesgaon Khurd. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बीवर! येसगाव परिसरात समाधानकारक पाऊस

Latest Agriculture News : उत्तर भागाकडील सर्व विहिरी जलसोत्राचा मोठा लाभ झाला. विहिरी पाण्याने तुडुंब भरू लागल्या आहेत. त्यामुळे यंदा रब्बी पिकाविषयी आशा द्विगुणित झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

येसगाव : येथील बळीराजाला निसर्गाने भरभरून दान दिले असून गिरणा नदीच्या पाण्यामुळे उत्तर भागाकडील सर्व विहिरी जलसोत्राचा मोठा लाभ झाला. विहिरी पाण्याने तुडुंब भरू लागल्या आहेत. त्यामुळे यंदा रब्बी पिकाविषयी आशा द्विगुणित झाल्या आहेत. खरिपातील नुकसान रब्बी निघून येण्याची आशा आहे. (Farmers hope now on Rabi season)

परिसरात पाहिजे तसा पाऊस झालाच नाही. जेमतेम पाण्यावर खरीप पिके निघून येतात. पण रब्बीसाठी प्रश्न निर्माण व्हायचा. बागायत क्षेत्र व्यक्तिरिक्त येथील भागात कोणते पाट, कालव्याच्या पाण्याच्या चाऱ्या नाहीत. नदी, नाले, कोरडे राहत असल्याने दूर दूरच्या पाइपलाइन मुळे घराजवळील विहिरींमध्ये पाणी टाकले जाते.

उन्हाळ्यात ठिबक पद्धतीचा फळबागांना उपयोग होत असे. काही वर्षापासून उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी आडव्या बोर ही केल्या. यंदा मात्र गिरणा नदीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या कच्च्या विहिरी नाही पाणी येऊ लागले आहे.

रब्बी शेत सिंचनासाठी पाण्यामुळे मोठी सोय झाली आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापन यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. रब्बी गहू, हरभरे, तसेच सध्या कांद्यांना चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कांदा पिकाकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. (latest marathi news)

शेतकऱ्यांनी रब्बीच्या व्यतिरिक्त पाण्याची नियोजन व चांगले सिंचन व्यवस्थापन केले तर उन्हाळ्यातही उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि शाश्वत शेतीसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. उन्हाळ्यातही सर्वत्र शेती पावसाळ्यातील श्रावण ऋतू प्रमाणे हिरवीगार भासू शकेल.

"यावर्षी पाऊस चांगला झालाच नाही. परंतु गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात बऱ्याच दिवसापासून पाणी वाहत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे उत्तर भागातील विहिरींना पाणी उतरले. रब्बीतील पिके निघून येण्याची आशा आहे."

- सतीश डी. शेलार, शेतकरी, येसगाव खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT