नाशिक

जिल्ह्यात ५३७५ शेतकर्यांना ५६ कोटींची कर्ममाफी

CD
जिल्ह्यात आणखी एक हजार शेतकरी कर्जमुक्त --------------- चौथी यादी प्रसिद्ध ः आतापर्यत ५ हजार ३७५ शेतकऱ्यांना ५६ कोटींची माफी ---------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.६ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५३७५ शेतकऱ्यांना ५५ कोटी ९० लाखाचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफीची चौथी यादी प्रसिध्द झाली असून त्यात एक हजार शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले जात आहे. आजपर्यंतच्या कर्जमाफीत राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांच्या ४ हजार १८६ पात्र लाभार्थ्यांना ४८ कोटी ६३ लाख रुपये मिळाले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार १८९ पात्र लाभार्थ्यांना ७ कोटी २७ लाख रुपये अशी एकूण ५ हजार ३७५ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ५५ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी केले आहे. आतापर्यंत ४० हजार २५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. …. जिल्ह्यात ६३ हजार ३१९ पात्र कर्जदार महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांनी ४२ हजार ५४६ पात्र शेतकऱ्यांची, तर जिल्हा बँकेच्या २३ हजार ७७३ पात्र शेतकऱ्यांची, अशी एकूण ६३ हजार ३१९ पात्र थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. … असा मिळाला लाभ पहिली यादी : ३५ हजार ८९० शेतकरी दुसरी यादी : ३ हजार ८०६ शेतकरी तिसरी यादी : ४ हजार ६९१ शेतकरी चौथ्या यादी : १ हजार ३७ शेतकरी ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मुंबईत इमारतीच्या २३व्या मजल्यावर भीषण आग! दिवाळीच्या रॉकेटने आग लागल्याचा संशय

AI Safety: एआयला अधिकार देण्याची घाई करू नका; अन्यथा मोठे संकट अटळ! कोणी दिला धोक्याचा इशारा?

YouTube Tutorials Fake Currency Racket : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून छापल्या चक्क ६.७८ कोटींच्या बनावट नोटा! नंतर स्वतःच 'पोलीस' बनून लोकांना लुटलं; धक्कादायक प्रकार उघडकीस

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT