आतील पान (फोटो- ३२५४३)
रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा!
प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा करण गायकर यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनांनंतरही एमएसआयडीसी व जिल्हाधिकारी प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केला. प्रलंबित मागण्यांवर न्याय न मिळाल्यास कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विंचूर गवळी आणि माडसांगवी येथील निवाडे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे मान्य करण्यात आले. ते रद्द करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, मखमलाबाद-गोवर्धन आणि विंचूर गवळी अलाइनमेंटबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत प्रक्रिया थांबवण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गायकर यांनी केला.
भरपाईसाठी गुणांक एकऐवजी दोन लागू करणे, फळबागांचे योग्य मूल्यांकन आणि फेरसर्वेक्षण या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. मखमलाबाद-गोवर्धन अलाइनमेंट रद्द करून पर्यायी प्रस्ताव पाठवावा, तसेच विंचूर गवळी येथे अस्तित्वातील ६० मीटर डीपी रोडनेच रस्ता न्यावा, अशी मागणी त्यांनी केली. एमएसआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
यावेळी दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, अक्षय कातड, पंकज खताळे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.