पान तीन
----------------------
32181
नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी शिर्डीतून अटक करण्यात आलेले संशयित. समवेत शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक.
प्राणघातक हल्ल्यातील
संशयितांना शिर्डीतून अटक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : देवळाली कॅम्प परिसरातील जुने स्टेशनवाडी स्मशानभूमीजवळ तरुणावर कोयता व फायटरने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिर्डीत नाट्यमयरीत्या जेरबंद केले.
संपत शंकर वायकर (वय २३, रा. पिंपळवाडी, शिर्डी), तुषार ऊर्फ बोक्या सुनील कोकणे (वय २२, रा. स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
२४ सप्टेंबरला युवक मित्रासोबत पेट्रोल भरत असताना संशयित संपत वायकर आणि तुषार कोकणे हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. आपल्यातील जुने वाद मिटवून टाकू असे सांगून त्यांनी युवकाला जुन्या स्टेशनवाडी स्मशानभूमीजवळ नेले. तेथे तू प्रेम थोरात याच्यासोबत का राहतो? या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करत चामडी पट्ट्याने, फायटरने आणि धारदार कोयत्याने छातीवर, पाठीवर व हातपायांवर वार करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करून आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन संशयित पसार झाले होते.
------
भाजीबाजारात सापळा
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, साहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, साहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार, अंमलदार मनोज शिंदे यांना दोघे संशयित शिर्डीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. युनिट दोनचे प्रभारी साहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक हेमंत मोहिते, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, चंद्रकांत गवळी, मनोज शिंदे, संतोष सुपेकर व जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने शिर्डी येथील भाजी बाजारात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या वादातून हा हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.