नाशिक

नाशिक एफडीएने केले १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित

CD
पान-३ ॲंकर----------- फोटो वापरणे ------------- तब्बल १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित नाशिक ‘एफडीए’चा दणका : वीस दिवसात पावणे चार कोटींचा साठा जप्त सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिक विभागात राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत विभागातील १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, तब्बल ३ कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा २ लाख २७ हजार किलोग्रॅम अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे व सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान मिठाई, चिवडा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, खोया, बटर, पॅक ड्रिंकिंग वॉटर, खवा, मावा आणि भगर यांसारख्या अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने मसाले, खाद्यतेल, मिठाई व फरसाण यांचा समावेश आहे. उत्पादनाची साठवणूक अस्वच्छ व अयोग्य परिस्थितीत होत असल्याचे तसेच अन्नपदार्थ विहित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचा संशय आढळला. अन्नपदार्थांच्या लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ब्रँडिंग करण्यात आले होते. खाद्यतेलाच्या पुनर्पेकिंगसाठी वापरलेल्या डब्यांचा बेकायदेशीर पुनर्वापर होत असल्याचे समोर आले. तसेच पॅकिंगवर ''Fortified Oil'' असा दावा असताना वैध फोर्टिफिकेशन परवाना आढळून आला नाही. मिठाई तयार करताना विहित मर्यादेपेक्षा जास्त खाद्यरंगाचा वापर केल्याचे निदर्शनास आले. १६-१ ​जिल्हानिहाय स्थिती ​नाशिक : ६५ ​जळगाव : २३ ​धुळे : १३ ​अहिल्यानगर : १० ​नंदुरबार : ०९ १६-१ तक्रारीसाठी संकेतस्थळ नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, तसेच अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच नियमांनुसार व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

Latest Marathi News Live Update: : "आमदारांचे वेतन बंद करा, पण दिव्यांगांचे मानधन ५ ते १० हजारांपर्यंत वाढवा"; अमरावतीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणांची आक्रमक मागणी

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

SCROLL FOR NEXT