Office of the Divisional Commissioner esakal
नाशिक

Nashik News : विभागीय आयुक्तपदासाठी अधिकाऱ्यांची ‘फिल्डिंग’

Nashik News : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे ३१ मेस निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरवात झाल्याचे समजते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे ३१ मेस निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरवात झाल्याचे समजते. यात नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण गेडाम, माजी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, राधाकृष्णन बी यांच्या नावांची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. (Fielding of officers for post of Divisional Commissioner)

त्यामुळे यापैकी कुणाची नियुक्ती होते की अन्य अधिकारी येथे नियुक्त होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालीच पार पडते. या निवडणुकीची घोषणा झाल्याने विभागीय आयुक्तपद दीर्घकाळ रिक्त ठेवणे अशक्य आहे. त्यादृष्टीने आतापासूनच अधिकाऱ्यांचे नियोजन सुरू झाले.

तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर येथे कुणाला नियुक्ती मिळणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी नाशिक महापालिकेचे आयुक्त राहिलेले प्रवीण गेडाम विभागीय आयुक्तपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. याशिवाय, २०१५ च्या सिंहस्थ काळात जिल्हाधिकारी राहिलेले दीपेंद्रसिंह कुशवाह. (latest marathi news)

माजी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांसह आदिवासी विकास आयुक्तालयातील नयना गुंडे याही विभागीय आयुक्तपदाच्या शर्यतीत असल्याची महसूल वर्तुळात चर्चा आहे. गमे यांच्या निरोप समारंभानिमित्त वरिष्ठ अधिकारी नाशिकला भेट देणार असल्याचे समजते. अधिकारी नियुक्तीची चर्चा आतापासून सुरू झालेली असली, तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच आदेश निघतील, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

...तर आदिवासी आयुक्त बदलतील

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची आदिवासी आयुक्तपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जाते. खत्री यांचे पती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सध्या नाशिकची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने खत्री प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT