राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे sakal
नाशिक

नाशिक : खड्डे १५ दिवसांत बुजवा, अन्यथा रामायण निवासस्‍थानासमोरच खड्डे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरातील सर्व खड्डे पुढील १५ दिवसांमध्ये बुजवा, अन्यथा महापौरांचे रामायण निवासस्थान, स्थायी समितीचे सभापती आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या घरांसमोर खड्डे करू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

श्री. खैरे म्हणाले, की स्मार्ट सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या स्मार्ट नाशिकची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाइपलाइन, वायर्स अन्‌ पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत.

शहरातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होतात. जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकमध्ये आले असताना महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यात माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून सर्वत्र चिखल झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. मात्र, सुस्त सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. दिवाळीचा सण जवळ येत असल्याने नाशिककर खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत असून, कमरेचे व मणक्याचे आजार उदभवू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT