District Planning Committee esakal
नाशिक

District Planning Committee : अखेर जिल्हा नियोजन समितीला 270 कोटी प्राप्त; सर्वसाधारण योजनेसाठी 813 कोटींची मागणी

Nashik News : जिल्हा नियोजन समितीला दर वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून एप्रिलअखेर प्राप्त होणारा निधी दोन महिन्यांच्या विलंबानंतर जूनमध्ये प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा नियोजन समितीला दर वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून एप्रिलअखेर प्राप्त होणारा निधी दोन महिन्यांच्या विलंबानंतर जूनमध्ये प्राप्त झाला आहे. सर्वसाधारण योजनांसाठी ८१३ कोटी रुपये मंजूर असताना २७० कोटी रुपये (३३ टक्के) निधी प्राप्त झाल्यामुळे विधान परिषदेची आचारसंहिता संपेपर्यंत विविध विभागांना कामांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. आचारसंहिता संपताच प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Finally District Planning Committee received 270 crores)

जिल्हा नियोजन समिती मेच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व इतर प्रादेशिक कार्यान्वयीन यंत्रणांना नियतव्यय कळवते. यानंतर जिल्हा परिषदेचे सर्व विभाग ताळमेळ करून दायित्व निश्चित करून उर्वरित निधीच्या प्रमाणात नियोजन करते. मात्र, दर वर्षीचा हा पायंडा यंदा मोडीत निघाला आहे.

राज्याच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीला ८१३ कोटींच्या नियतव्ययानुसार निधी पाठवण्यास विलंब केल्याने पुढील सर्व प्रक्रिया थांबली होती. त्यात लोकसभा निवडणुकची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निधी दिला जात नव्हता. जूनमध्ये आचारसंहिता संपताच जिल्हा नियोजन समितीला निधी प्राप्त झाला आहे.

१५ जुलैनंतरच प्रशासकीय मान्यता

जिल्हा परिषद व इतर विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण योजना, अनुसूचित जमाती घटक योजना व अनुसूचित जाती घटक योजनांसाठी निधी दिला जातो. त्यात सर्वसाधारण योजनेसाठी ८१३ कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जमाती घटक योजनेसाठी ३४९ कोटी रुपये व अनुसूचित जाती घटक योजनेसाठी १०० कोटी रुपये नियतव्यय कळवला आहे. (latest marathi news)

निधी प्राप्त झाल्याने सर्व विभागांन अंदाजे नियतव्यय कळविण्यात आला आहे. त्यानुसार विभागांचे नियोजन सुरू झालेले असले तरी १५ जुलैनंतरच प्रशासकीय मान्यतांना सुरवात होणार आहे.

विधान परिषद निवडणुकीचाही अडथळा

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्हा परिषद व इतर विभागांना कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीचे नियोजन जुलैपर्यंत पुढे ढकलणे अपरिहार्य ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT