Tribal Development Department  esakal
नाशिक

Tribal Recruitment : ‘आदिवासी’च्या भरतीला अखेर मुहूर्त! ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू; 614 पदांसाठी सरळ सेवा भरती

Latest Nashik News : आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार, या भरती प्रक्रियेला मुहूर्त लागला असून विभागांतर्गत ६१४ पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून विविध १९ संवर्गातील ६०२ पदांसाठी मेगा भरती राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १३ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. परंतु ११ जून २०२४ रोजी मराठा आरक्षणासह (एसईबीसी) नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यामुळे ही पदभरती स्थगित होती. आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार, या भरती प्रक्रियेला मुहूर्त लागला असून विभागांतर्गत ६१४ पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (finally time for recruitment of tribals)

शनिवारी (ता.१२) दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरता येणार आहे. २ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भरतीत विभागातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक सह एकूण १४ पदांचा यात समावेश आहे.

आदिवासी विकास विभागाने सुधारित आकृतिबंध मंजूर केला असून शासन निर्णय वित्त विभाग ३१ ऑक्टोबर २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर आहे. त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार आदिवासी विकास विभाग आयुक्त यांनी त्यांच्या अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील विविध भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार आहे. (latest marathi news)

रिक्त पदांचा तपशील

एकूण जागा : ६१४

पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक (१८), संशोधन सहायक (१९), उपलेखापाल-मुख्य लिपिक (४१), आदिवासी विकास निरिक्षक (१), वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक (१४८), लघुटंकलेखन (१०), गृहपाल (पुरुष) (६२), गृहपाल (स्त्री) (२९), अधिक्षक (पुरुष) (२९), अधिक्षक (स्त्री) (५५), ग्रंथपाल (४०), ग्रंथपाल सहाय्यक (६), प्रयोगशाळा सहाय्यक (३३), कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (४५), कॅमेरामन-कम-प्रोजेक्ट ऑपरेटर (१) एकूण (५३७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT