Maha E-Seva center esakal
नाशिक

Maha E-Seva Kendra : महा ई-सेवा केंद्रचालकांसमोर आर्थिक संकट!

Nashik News : नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, विविध कागदपत्रे सहज व सुलभ उपलब्ध होण्यासाठी शासनाने महा ई-सेवा केंद्र ही डिजिटल सेवा २००८ पासून सुरू केली.

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

कळवण : नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, विविध कागदपत्रे सहज व सुलभ उपलब्ध होण्यासाठी शासनाने महा ई-सेवा केंद्र ही डिजिटल सेवा २००८ पासून सुरू केली. नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी दाखल्यांचे दर निश्‍चित केले. मात्र, दरात १६ वर्षांपासून वाढ न झाल्याने महा ई-सेवा केंद्रचालकांसमोर आर्थिक संकट उभे आहे. (Financial crisis in front of Maha e service center)

साधनांचा खर्च वाढल्याने शासनाकडून निर्धारित केलेल्या रकमेतही वाढ व्हावी, अशी मागणी केंद्रचालकांकडून होत आहे. महा ई-सेवा केंद्रांमधून शासकीय दाखले, शिधापत्रिका, प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना कागदपत्रांसाठी रांगेत उभे राहण्यास लागू नये, यासाठी प्रत्येक भागात दहा हजार नागरिकांमागे एका केंद्रास मंजुरी दिली होती.

तसेच, महा ई-सेवा केंद्रचालकांकडून फसवणूक होऊ नये. यासाठी शासनाने दाखल्यांचे दर निश्‍चित करून त्याचे फलक कार्यालयात लावण्याचे आदेश दिले होते. शासनाने दर निश्‍चित करताना केंद्रचालकांना सुमारे दहा रुपये मिळतील, याची दक्षता घेतली होती. परंतु, ते १६ वर्षांपूर्वी निश्‍चित केल्याने सध्याच्या खर्चाबरोबर ताळमेळ बसत नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी, काही चालक निर्धारित रकमेपेक्षा अधिक रुपयांची मागणी करताना दिसतात.

शासन निर्धारित रकमेत इंटरनेट खर्च, कार्यालयाचे भाडे, प्रिंटिंग, कर्मचाऱ्यांचा पगार, कॉम्प्युटर मेंटेनन्स आदी खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांनी केंद्रे बंद केली. काहींनी अन्य व्यक्तीस भाडेतत्त्वावर दिली. सध्या वाढती महागाई पाहता शासनाकडून निर्धारित केलेल्या रकमेत वाढ व्हावी, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

एजंटगिरीचा सुळसुळाट

विविध दाखले, उतारे जलद मिळवून देतो, असे सांगत काही एजंट सेतू केंद्रांमधून टोकन घेऊन नागरिकांकडून मोठी रक्कम वसूल करताना दिसतात. याबाबत अनेकदा तक्रारी होत असतात. मात्र, त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्याचा फटकाही महा ई-सेवा केंद्रचालकांनाही सहन करावा लागल्याचे दिसून येते.

२००८ मध्ये निश्‍चित केलेले दर

■ शासकीय दाखले : ३३.६०

■ शिधापत्रिका : ३३.६०

■ प्रतिज्ञापत्र : ३३.६०

■ जमिनीविषयी डिजिटल उतारा : १५

"महा ई-सेवा केंद्र- आपले सरकार केंद्र २००८ मध्ये सुरू झाल्यापासून आजही आमच्या पावतीची रक्कम ३३ रुपये ६० पैसे इतकीच आहे. त्यात आम्हाला फक्त आठ रुपये ५० पैसे मिळतात. बाकी शासनजमा होते. महागाईत प्रत्येक वस्तूचे दर वाढले. आम्ही त्याच दरात काम करतोय. या मागणीची दखल घ्यावी." - हेमंत पाटील, महा ई-सेवा केंद्रचालक, कळवण

"महा ई-सेवा केंद्र सुरू केल्यावर शासनाने पूर्वीचे दर तसेच ठेवले आहेत. वाढत्या महागाईमुळे हे दर अपुरे पडत आहेत. केंद्रचालक नुकसान होत असतानाही केंद्र चालवत आहेत. त्यामुळे दरवाढ होणे आवश्यक आहे." - मुन्ना काकुळते, केंद्रचालक, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT