Workers dousing the fire in the woodshed here. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : मालेगाव शहरात आगीच्या 3 घटनांमध्ये 55 हजारांचे नुकसान

Fire Accident : शहरात रविवारी (ता. २१) तीन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. तिन्ही घटनांत सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : शहरात रविवारी (ता. २१) तीन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. तिन्ही घटनांत सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने लाखो रुपयांचे नुकसान टळले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. येथील सोयगाव भागातील चर्चजवळील लोटस हॉस्पिटलजवळ गॅसगळतीने विजय प्रदीप परदेशी (रा. गवती बंगला, दाभाडी रोड) यांच्या कपडे प्रेस करणाऱ्या टपरीला आग लागली. (Nashik Fire Accident Damage of 55 thousand in 3 incidents of fire in Malegaon city )

यात टपरी व टेबलचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले. सोयगाव येथील अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. आगीची दुसरी घटना मनमाड चौफुली येथे घडली. नवीन रवजी पानसानी यांच्या भगवान स्वामील लाकूड वखारला आग लागली.

यात पाच हजारांचा लाकडी भुसा जळाला. रविवारी (ता. २१) सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. वेळेत अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवली. त्यामुळे येथील घटनेत मोठे नुकसान टळले.

तिसरी घटना नानावटी पेट्रोल पंपामागील कलेक्टर पट्टा भागातील मोकळ्या भूखंडावर घडली. भूखंडावरील प्लॅस्टिकच्या कचऱ्याला अचानक आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील बागूल, प्रदीप शिंदे, शरद चौधरी, भूषण अहिरे, रफिक खान, मोहन बैरागी आदींनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची 'डोकेदुखी' वाढवणारी बातमी! निमित्त ठरतोय पाकिस्तानी... नेमकं काय घडलंय?

Crime: सासरेबुआ, तुमच्या मुलीचे तीन प्रियकर, तिला समजावून सांगा! जावयाची विनंती; पण सासऱ्यानं उलट उत्तर दिलं अन्...; नको ते घडलं

किती गोड! दीपिकानंतर 'ठरलं तर मग'मधील अस्मिताने दाखवला लेकीचा चेहरा; म्हणते, 'दिवाळी पाडव्याला आम्ही...'

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरजची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती, Video

SCROLL FOR NEXT