A house fire. esaka
नाशिक

Nashik Fire Accident : झोपडीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

वेहेळगाव (जि. नाशिक) : मळगाव (ता. नांदगाव) येथील निंबा मोतीराम पवार यांच्या झोपडीस आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य व पैसे जळून खाक झाले. सर्व उभा केलेला संसार डोळ्यासमोर भस्म होताना अश्रूचा बांध फुटला होता. गावचे उपसरपंच नितीन आहेर यांनी धीर देत घटना आमदार सुहास कांदे यांच्याकडे कथन केली. आमदारांनी सर्व कुटुंबाला घरी बोलावून सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे व कुटुंबासाठी रोख दहा हजार रुपयाची मदत देऊ केली आहे. (Nashik Fire Accident Hut including household items got burnt at malgaon suhas kande helped the victims Nashik news)

मळगाव येथील निंबा पवार हे आदिवासी वस्तीत आपल्या कुटुंबासह झोपडीत राहत होते. थंडी थोडी कमी असल्याने सर्व कुटुंब बाहेर अंगणात झोपलेले होते. घरात दिवा लावलेला होता. पहाटे चारला निंबा पवार यांना झोपडीतून मोठा जाळ दिसायला लागला. त्यांनतर त्यांनी आरडाओरड सुरु केली. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले. पवार कुटुंब इतरांच्या शेतात मोलमजुरी करून पोट भरतात.

मजुरीचे पै पै पैसे गोळा करून घरात पंधरा हजार रुपये जमा करून ठेवलेले होते. पाच पोते बाजरी जमा झालेली होती. सर्व जमा केलेली पुंजी व घरातील संसार उघड्यावर येऊन पडला. आमदार कांदे यांनी धीर देत मी नेहमी तुमच्यासोबत आहे काही गरज लागल्यास कळवा पाठवून देईल, असा आधार कुटुंबाला दिला व अधिकाऱ्यांना सूचना करून सदर घटनेचा पंचनामा करून त्यांना कशी मदत देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT