Godan Express Caught Fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident : भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला लागली आग; मोठा अनर्थ टळला

Nashik News : गाडी थांबवून बोगीची आग वेळीच विझवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अंबादास शिंदे

नाशिकरोड : नाशिक रेल्वे स्थानकातुन भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली. गाडी थांबवून बोगीची आग वेळीच विझवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Nashik Fire accident parcel carriage of Godan Express marathi news)

मुबंई लोकमान्य टिळक टर्मिनस वरून -गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमी प्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकात आली. स्थानक सोडल्या नंतर गोरेवाडी नजीक, मनपाच्या जलशुद्धकरण केंद्रा जवळून गोदान एक्सप्रेस जात असतांना गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले.

काही क्षणांतच वाऱ्यामुळे बोगीमधून धुरा बरोबर अगीचे लोट येऊ लागले. सदर बाब शेजारील बोगी मधील प्रवासींच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर गाडीच्या गार्डला समाजल्य नंतर त्यांनी तत्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या.

तत्काळ अग्निशामक दलाला कळवण्यात आले, तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती. स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफूलसिंह यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोननसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, कुलकर्णी आप्पा, आदिसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.  (latest marathi news)

अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले, मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते. अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगी पासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला. बोगी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली.

या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थनकातून सुटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही, जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिक कडे रवाना झाले असून या घेतानेची उच्च सत्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकारीने सांगितले. बाधित बोगीमध्ये कशाने आग लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT