Five people from Nashik Road drowned in Bhavali Lake esakal
नाशिक

Nashik News : मोबाईल पाहिला अन्‌ काळजाचा ठोका चुकला; तिन्ही मुलांच्या मृत्यूनंतर आई सिमरन यांनी फोडला दुबईत टाहो

Nashik News : नाशिक रोड येथील पाच जण भावली तलावात बुडाल्यावर तिन्ही मुलांच्या आईने घडलेली घटना बोलून दाखवली.

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दुबईत काम करीत होते. काम झाल्यावर सहज व्हॉट्सॲप पाहिले, तर माझ्या तिन्ही मुलांच्या मृतदेहांची छायाचित्रे पाहायला मिळाली. तत्काळ माझे पती दिलदार खान यांना फोन लावला आणि म्हटले, ‘मेरे तिनो बच्चे मुझे वापीस ला दो दिलदार’. असे म्हटल्यावर दुबईतील माझी घरमालकीण मला म्हटली, ‘काय झाले?’ मी म्हटले, ‘माझ्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.’ हे ऐकून घरमालकिणीला धक्का बसला. (Five people from Nashik Road drowned in Bhavali Lake)

मी पूर्ण गर्भगळीत झाले. मला काहीच समजत नव्हते. घरमालकिणीने तेथील विजा आणि फ्लाइटचे तिकीट काढून दोन केअर टेकरबरोबर मला मुंबईपर्यंत जाण्याची व्यवस्था केली. रात्री दोनची फ्लाइट होती. सकाळी साडेसहाला मी मुंबईत पोहोचले आणि माझे मामा मुंबईला मला घ्यायला आले. मामांनी मुंबई येथून गाडी सुरू करून थेट नाशिक रोडला आणून थांबवली.

मी आल्यावर माझ्या डोळ्यांसमोर काळजाचे तिन्ही मृतदेह होते. नाशिक रोड येथील पाच जण भावली तलावात बुडाल्यावर तिन्ही मुलांच्या आईने घडलेली घटना बोलून दाखवली.
भावली धरणात अनस दिलदार खान (वय १५), नाझिया इमरान खान (१५), मिजबाह दिलदार खान (१६), हनीफ अहमद शेख (२४), ईकरा दिलदार खान (१४) यांचा बुडून मृत्यू झाला. (latest marathi news)

तेव्हा अनस, मिजबाह आणि ईकरा या तिघांच्या आई सिमरन दुबईत काम करीत होत्या. नाशिकला आल्यावर तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून सिमरन यांनी हंबरडा फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. आई मुलांसाठी काय करू शकते, हे मुलांचा मृत्यू झाल्यावर लोकांना पाहायला मिळाले. या तिन्ही मुलांचे वडील दिलदार महबूब खान हे पळसे येथील पारले कंपनीत काम करतात. आपली तिन्ही मुले त्यांनी गमावल्याने सध्या त्यांच्या आयुष्यात काळोख दाटलेला आहे.

"मुलांना एकटे कुठेच सोडायचे नाही. नेहमी आई सोबत असायला हवी. झालेली घटना हृदयाला भगदाड पाडणारी आहे. सहलीला जाताना मुलांवर लक्ष ठेवल्यास अशा घटना पुनश्‍च घडणार नाहीत." - सिमरन खान, तीन मृत मुलांची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT