Flag hosting puja esakal
नाशिक

Nashik News : गंगागिरी महाराजांच्या नारळी सप्ताहाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik News : या सप्ताहातून माध्यमातून धर्म जागरण करत समाज संघटित आणि शिक्षित करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे असे प्रतिपादन सरला बेट चे महंत रामगिरी महाराज यांनी केले.

अजित देसाई

वावी : सरला बेटने वारकरी धर्माची पताका उंचावत ठेवण्याचे काम केले आहे. गंगागिरी महाराजांच्या सप्ताह परंपरेला २०० वर्षांचा इतिहास आहे. या सप्ताहातून माध्यमातून धर्म जागरण करत समाज संघटित आणि शिक्षित करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे असे प्रतिपादन सरला बेट चे महंत रामगिरी महाराज यांनी केले. (Nashik Flag Hoisting of Gangagiri Maharaj narali saptah)

पंचाळे (ता.सिन्नर) येथे गंगागिरी महाराजांचा १७७ वा नारळी सप्ताह सोहळा येत्या १० ऑगस्ट पासून सुरु होत आहे. आज बुधवारी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भजन ध्वजारोहण झाले. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील १२ ते १५ हजार भाविक उपस्थित होते. आमदार माणिकराव कोकाटे, गत सप्ताहाचे संयोजक आमदार प्रा. रमेश बोरणारे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी सौ. दीप्ती वाजे, महंत काशीकानंद महाराज, उदय सांगळे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर होते.

तब्बल १२ वर्षापासून पंचाळे येथील ग्रामस्थ सप्ताह सोहळ्याच्या आयोजनाची मागणी यंदा पूर्णत्वास गेली. सप्ताह सोडण्याची अगदी मुघल राजवटी पासून अखंडपणे परंपरा सुरू आहे. सरला बेट हे वारकरी संप्रदायाच्या साधना आणि परमार्थाचे केंद्र आहे. गंगागिरी महाराजांच्या परंपरेत होउन गेलेल्या पाच महात्म्यांनी सप्ताहाची परंपरा त्याच उत्साहाने पुढे जोपासली.

अवघ्या मानव जगताचे कल्याण व्हावे हा दृष्टिकोन ठेवून गंगागिरी महाराज सरला बेटातून बाहेर पडले होते. पांगरीचे संत परंपरेतील माधवनाथ महाराज व गंगागिरींचा स्नेह होता. खेडले झुंगेचे तुकाराम महाराज, पंढरपूरचे जोग महाराज हे देखील गंगागिरींच्या शिष्य परंपरेतील.

त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी संवर्धनात गंगागिरी महाराजांनी पुढाकार घेतला होता. शिर्डीच्या साईबाबांची देखील शिर्डीकरांना खरी ओळख करून दिली ती गंगागिरी महाराजांनी. अशा प्रकारचे असंख्य उदाहरणातून महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नर व परिसराशी स्नेहबंध अधोरेखित केला. (latest marathi news)

कार्यक्रम स्थळी आल्यानंतर रामगिरी महाराज यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्थानिक शाळांचे विद्यार्थी लेझीम पथक ढोल पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मारुती मंदिरात पूजनानंतर रामगिरी महाराज व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.

सिन्नरला विठ्ठल सृष्टीचा संकल्प

सप्ताहात कोणतीच उणीव भासू देणार नाही. सिन्नरकर कुठेच कमी पडणार नाही. वैजापूरपेक्षा भव्य दिव्य कार्यक्रम होईल असा शब्द देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरला सर्व सुविधा युक्त विठ्ठल सृष्टी उभी करण्याचा संकल्‍प जाहीर केला. सुमारे ११० फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती, वारकरी प्रशिक्षण विभाग, संग्रहालय, ग्रंथालय, कार्यक्रम हॉल करण्यात येईल असे ते म्हणाले.

- उपमुख्यमंत्री अजित पवार देणार एकादशीची पंगत

- वैजापूर सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

- वैजापूर येथील समिती करणार नियोजनात मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT