दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबादसाठी दैनंदिन विमानसेवा
२५ ऑक्टोबरपासूनचे हिवाळी वेळापत्रक जाहीर, गोव्याची सेवा खंडित
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : येथील ओझर विमानतळावरून २५ ऑक्टोबरपासून विमानसेवेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार नाशिकहून दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद या चार प्रमुख शहरांसाठी इंडिगो एअरलाइन्सची विमाने रोज उड्डाण करतील. गोव्यासाठी सुरू केलेली विमानसेवा मात्र खंडित झाली आहे.
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता राजधानी दिल्लीसाठी सकाळ आणि रात्र अशा दोन्ही सत्रांत रोज थेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय दक्षिण भारतातील प्रमुख आयटी हब असलेल्या बेंगळुरू व हैदराबादसह गुजरातच्या अहमदाबाद शहरासाठीही थेट विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, भाविक आणि पर्यटकांचा मोठा वेळ वाचणार आहे. या प्रमुख शहरांतून नाशिकला येणाऱ्या प्रवाशांचीदेखील विमानसेवेमुळे सोय होणार आहे. ओझर विमानतळावर प्रवाशांची वर्दळ वाढत असून, सातत्यपूर्ण विमानसेवेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होते आहे. त्यामुळे विमानसेवेला प्रतिसाद वाढता आहे.
इन्फोः
२५ ऑक्टोबरपासूनचे वेळापत्रक
नाशिकहून इतर शहरांसाठी
* दिल्ली : सकाळी ९:१५ वाजता आणि रात्री ९.५५ वाजता
* हैदराबाद : दुपारी २:२० वाजता
* बेंगळुरू : दुपारी ४:२० वाजता
* अहमदाबाद : सायंकाळी ५:४० वाजता
---
इतर शहरांतून नाशिकसाठी
* दिल्लीहून : सकाळी ६:४० वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता
* हैदराबादहून : दुपारी १२:३५ वाजता
* बेंगळुरूहून : दुपारी २:०० वाजता
* अहमदाबादहून : दुपारी ४:०५ वाजता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.