Godavari Flood esakal
नाशिक

Nashik Godavari Flood News : सोमेश्वर, गोदाघाटावर ‘पूर’ पर्यटन! पोलिसांचा चोख बंदोबस्त; सेल्फीवाले जुमानात

Nashik News : गोदाघाटावर पोलीस असले तरी ते बघ्याच्याच भूमिकेत दिसून आले. दरम्यान, रविवारी (ता. ४) दुपारी पुराच्या पाण्यात तरुण अभियंता वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Godavari Flood News : शहर परिसरासह गंगापूर धरण क्षेत्रात संततधार पावसामुळे सोमेश्वर धबधबा खळखळून वाहू लागला असून गोदाघाटावरील मंदिरा पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तर, पुराच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून पुराच्या पाण्यात उतरून धोकादायकरित्या सेल्फी काढत आहेत.

मात्र सोमेश्वर येथे करण्यात आलेले बॅरिकेटींग तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तर गोदाघाटावर पोलीस असले तरी ते बघ्याच्याच भूमिकेत दिसून आले. दरम्यान, रविवारी (ता. ४) दुपारी पुराच्या पाण्यात तरुण अभियंता वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Flood tourism on Someshwar Godaghat)

गोदावरी नदी पात्राच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे.

गंगापूर धरणातून रविवार (ता. ४) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर, शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे गोदावरी नदी पात्राच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे.

यामुळे सोमेश्वर येथे खळाळणारा धबधबा आणि पाण्याचे रौद्ररुप पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. याठिकाणी धोकादायकरित्या धबधब्याजवळ जाणार्या पर्यटकांना अटकाव करण्यासाठी नव्याने बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार असे ९ पोलीसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त याठिकाणी आहे. (latest marathi news)

गोदाघाटावर गर्दी

तब्बल दोन वर्षांनी गोदावरी नदीला पावसाळ्यात यंदा पहिला पुर आला आहे. गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. तसेच, सकाळपासून गोदाघाट पाण्याखाली गेला. तर दुपारनंतर काही मंदिरेही पाण्याखाली गेली.

रविवारी दुपारीच तरुण अभियंता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरीही पर्यटकांची गर्दी हटत नव्हती. काही पर्यटक थेट पुराच्या पाण्यात उतरून मोबाईलमध्ये सेल्फी काढत होते. याठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता, परंतु तेही बघ्याच्या भूमिकेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT