Farmer Vasant Bagul while working in the field here
Farmer Vasant Bagul while working in the field here esakal
नाशिक

Nashik News : वनपट्टा मिळालेल्या मुरमाड जमिनीवर फुलवली बाग; जाबळा, सागवनसह विविध पिकांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वनपट्टा मिळालेल्या मुरमाड जमिनीवर अन उष्ण वातावरणात केरळ तसेच गोवासारख्या थंड भागातील फणस पिकवण्याची किमया अलंगुन, ता. सुरगाणा येथील तरुण आदिवासी शेतकऱ्याने केली आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव वसंत बागूल असून त्याची पत्नी कलावती बागूल त्यांना साथ देत आहेत. पारंपारिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची खूणगाठ बांधलेल्या या तरुण शेतकरी दाम्पत्याने चक्क केसर आंबा शेती फुलवत स्थानिक पिकामधील बदलाचा मार्ग मोकळा करून दिला. ()

शेतकरी बागूल हे आदिवासी समाजात सामाजिक काम करतात. ते सुशिक्षित असल्यामुळे शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड त्यांच्यात आहे. पारंपरिक पिकासह नारळ, साग, फणस, केशर आंबा, काजू, चिकू, लिंबू, फणस, बांबू, सीताफळ, लालपेरु, लाल सीताफळ, सफेद सीताफळ, तसेच सागाची ३०० झाडे, केशर आंबे २ हजार पेक्षा जास्त लागवड केली आहे.

अर्जुन सादडा, जांभळा, गुलाबाचे पंधरा प्रकार, जास्वंदी, मोगरा, तसेच शोभेची विविध प्रकारची पिके घेत शेतीत प्रयोग केले. उत्पादन चांगले घेऊनही योग्य भाव न मिळाल्याने हताश न होता शेतीत विविध प्रयोग सुरुच आहेत. मुलगा अमोल, तसेच मुली अर्चना, मयूरी हे तिघे शिक्षणासाठी बाहेर आहेत.(latest marathi news)

बाजारपेठेचा शोध

‘सकाळ’चे पंधरा वर्षांपासून वाचक असून ते ‘ॲग्रोवन’ मधील मुलाखती नेहमी वाचतात. या बाबत पत्नीशी चर्चा करतात. ह्या सर्व पिकाची माहिती मिळवण्यासाठी जिज्ञासा वाढल्याने इंटरनेट व राज्य शासनाच्या किसान हेल्पलाइनच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील, गुजरातमधील शेतकऱ्यांशी संपर्क करतात. पिकाविषयी प्राथमिक माहिती मिळवत वनपट्टा मिळालेल्या पडक्या मुरमाड जमिनीवर सुरवातीला दहा एकरमध्ये दोन हजार केशर आंब्यांची लागवड केली. जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असावा की एवढ्या प्रकारची झाडे आहेत. बाजारपेठेच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

''पारंपारिक पिके घेऊन समाधानकारक उत्पादन मिळायचे नाही. पीक पद्धतीत विविध प्रयोग करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळे मोखपाडा येथील देवाजी धवळू पवार यांचे मार्गदर्शन घेत ‘सकाळ ॲग्रोवन’ वाचून पहिल्याच प्रयत्नात या विविध पिकांची प्रयोग यशस्वी केला.''- वसंत बागूल, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT