नाशिक

जिल्ह्यात १२९ पुरेल एवढाच चारा

CD
जिल्ह्यात १२९ पुरेल एवढाच चारा उन्हाळ्यात चारा टंचाई भेडसावण्याची शक्यता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२ : जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाल्यामुळे केवळ १२९ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा वाहतुकीवर कठोर निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली जाते. जिल्ह्यात विविध प्रकारचे १८ लाख जनावरे आहेत. त्यांच्यासाठी दरमहा तब्बल २ लाख ७ हजार मेट्रिक टन चा-याची गरज असते. जिल्ह्यात पशुधनासाठी सुमारे ८ लाख ९३ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचे प्रशासनाच्या नियोजनातून समोर आले आहे. हा साठा सध्याच्या गरजेनुसार चार महिन्यांहून काही दिवस अधिक काळ पुरू शकतो. मात्र, पाणीटंचाईच्या काळात जनावरांना पाण्याबरोबर हिरव्या चा-याची उपलब्धता कमी झाल्यास या साठ्यावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. दिंडोरी, येवला, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि इगतपुरी या तालुक्यांमध्येही पशुधनाच्या तुलनेत उपलब्ध चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास सध्याच्या साठ्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागणार आहे. टँकरचे नियोजन चा-याबरोबरच पाणीटंचाईग्रस्त गावांतील पशुधनासाठी टँकरव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. शासकीय तसेच खासगी पाणी स्रोतांची उपलब्धता तपासून आवश्यकतेनुसार टँकरची संख्या निश्चित केली जाणार आहे. मात्र, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यास पशुधनासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. तालुकानिहाय स्थिती तालुका........पशुधन........चारा (टन) नांदगाव : २ लाख ८५ हजार..... ५३ हजार ३० मालेगाव : २ लाख ६८ हजार..... १ लाख २९ हजार ६०४ बागलाण : २ लाख ८ हजार...... २ लाख १ हजार ५०५ सिन्नर : १ लाख ५८ हजार.......६४ हजार ६५३ नाशिक : ७८ हजार ४८२..... ६१ हजार ५६८ निफाड: १ लाख ३१ हजार.....६९ हजार ९९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT