नाशिक

मानेनगरला होणार सुसज्‍ज फुटबॉलचे मैदान

CD
पान चार ------------------- 31524 नाशिक : असे असेल फुटबॉलचे प्रस्‍तावित मैदान.. मानेनगरला होणार सुसज्‍ज फुटबॉलचे मैदान कान्‍हेरे मैदानावर फ्लडलाईट, पालकमंत्री महाजन यांचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ः क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकसीत करण्याच्‍या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय जिल्हा नियोजन समितीअंतर्गत घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे पंचवटी परिसरातील मानेनगर येथील जागेत राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत फुटबॉल मैदान विकसित करण्यास तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रात्रीच्या सामन्यांसाठी अत्याधुनिक विद्युत झोत (हाय-मास्ट फ्लडलाईटस्) सुविधा उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी माहिती दिली. गेल्या काही वर्षांत नाशिकने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू, क्रिकेटपटू आणि विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू घडविले आहेत. उच्च दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधासाठी खेळाडूंना सरावासाठी मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांकडे जावे लागत होते. आता पालकमंत्री महाजन यांच्या पुढाकारामुळे नाशिकमधील खेळाडूंना स्थानिकस्तरावर उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होत आहेत. मानेनगर परीसरात ८ एकर जागा उपलब्‍ध आहे. येथे उभारल्‍या जाणाऱ्या फुटबॉल मैदानामध्ये उच्च दर्जाच्या लॉनसह ड्रेनेज सिस्टिम, पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आणि मैदानाच्या मानक आकारानुसार आवश्यक सुविधा विकसित केल्‍या जातील. त्यामुळे खेळाडूंना नियमित व दर्जेदार सरावासाठी मैदान उपलब्ध होईल. सामान्य व खडबडीत मैदानावर खेळताना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण कमी होण्यास या मैदानामुळे मदत होईल. यासह हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्समुळे नाशिकच्या क्रिकेटपटूंना रात्रीच्या प्रकाशात सराव करण्याची सुविधा मिळेल. या सुविधेमुळे नाशिकमध्ये रात्रीचे सामने खेळविता येतील. या उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांमुळे नाशिकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. नाशिकच्या खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाची गती आणि तांत्रिक कौशल्य अधिक विकसित होण्यास मदत होईल. या अद्ययावत प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार असल्‍याचे जिल्‍हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT